---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक संपताच भारतीय बॅडमिंटनपटूने उरकला साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 आज म्हणजेच रविवारी (11 ऑगस्ट) रोजी संपणार आहे. पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय संघाची मोहीम पूर्ण झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली, तर 7 व्या पदकाबाबत निर्णय होणे बाकी आहे. यावेळी भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक मिळाले नाही. दरम्यान, आता भारताचा बॅडमिंटनपटू श्रीकांत किदंबी याने तिच्या प्रेयसीशी साखरपुडा केले आहे.

श्रीकांतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहीती दिली आहे. त्याने प्रसिद्ध स्टायलिश श्रव्य वर्माशी साखरपुडा केले. दोघांनी आपापल्या इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “ती ‘हो’ म्हणाली आणि आता आम्ही आमची कायमची कथा लिहिण्यास तयार आहोत.”

अनेक स्टार खेळाडूंनी श्रीकांत किदंबीच्या पोस्टवर कमेंट्सद्वारे अभिनंदन केले. बॅडमिंटन स्टार एचएस प्रणॉयने लिहिले, “तुम्हा दोघांचे अभिनंदन.” याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलनेही कॉमेंटमध्ये अभिनंदन केले आहे. याशिवाय त्यांना इतरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Srikanth Kidambi (@srikanth_kidambi)

खरं तर श्रीकांत किदंबी पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला नव्हता. खराब कामगिरीच्या कारणमुळे तो पॅरिस ऑलिम्पिकच्या योग्यता फेरीस पात्र ठरला नव्हता.

वास्तविक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली ज्यात 5 कांस्य आणि 1 रौप्यपदकांचा समावेश आहे. 6 पैकी तीन पदके नेमबाजीत आली. याशिवाय हॉकीमध्ये एक, भालाफेकीत एक आणि कुस्तीमध्ये एक पदक मिळाले. विनेश फोगटच्या कुस्तीतील रौप्यपदकाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. विनेश फोगटच्या बाजूने निर्णय आल्यास भारताच्या झोळीत 7 पदकांची भर पडणार आहे. वास्तविक, 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले होते. विनेश महिलांच्या कुस्तीमध्ये 50 किलो फ्रीस्टाइल गटात सहभागी होत होती. अपात्र ठरल्यानंतर विनेशने रौप्य पदकाची मागणी केली होती, त्यावर निर्णय होणे बाकी आहे.

हेही वाचा-

विनेश फोगट प्रकरणी निकाल यायला विलंब का? निर्णय 13 ऑगस्टपर्यंत पुढे का ढकलण्यात आला?
“मी कोहलीला पाठीशी घालत नाही पण…” श्रीलंकेविरुद्ध गमावलेल्या मालिकेनंतर कार्तिकचा मोठा दावा
227 दिवसांनी अनुभवी फलंदाज मैदानात; पहिल्याच सामन्यात मोठी खेळी, टी20 संघात मिळणार का स्थान?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---