इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होती. यातील पाचवा कसोटी सामना शुक्रवारी (१० सप्टेंबर) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार होता. मात्र भारतीय सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने या सामन्याला रद्द करण्याचे ठरवले गेले. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणाले, “खेळात कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून भारतीय संघाने मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्ही आमचे सहयोगी आणि चाहत्यांनी माफी मागतो. आम्हाला माहिती आहे की, या बातमीमुळे तुम्ही खूप दु:खी झाला आहात.”
माध्यमांतील वृत्तांनुसार, पाचवा कसोटी सामना खेळण्याबाबत अनेक भारतीय खेळाडूंनी चिंता व्यक्त केली होती. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) झालेल्या चर्चेदरम्यान देखील खेळाडूंनी खेळण्यावर स्पष्ट मत दिले नाही. भारतीय संघाचे सहयोगी फिजिओ कोरोना संक्रमित आढळले होते, ज्यानंतर हा सामना होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र आता या सामन्याला रद्दच केले गेले आहे.
#EngvInd pic.twitter.com/gF4zW9ajV2
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) September 10, 2021
This is such a shame – as it’s been a wonderful series ! https://t.co/tPPrAJXCoT
— Shane Warne (@ShaneWarne) September 10, 2021
https://twitter.com/KP24/status/1436242834378698755?s=20
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सर्वजण सोशल मीडियावर आपआपल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. अगदी केविन पीटरसन, शेन वॉर्न, वसीम जाफर अशा माजी क्रिकेटपटूंनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
When you are waiting for 5th Test and it gets postponed – pic.twitter.com/5aDmVKreio
— g0v!ñD $#@®mA (@rishu_1809) September 10, 2021
याबरोबरच येत्या आयपीएल २०२१ साठी भारतीय कर्णधार विराट कोहलीने हा निर्णय घेतला असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावर एका चाहत्याने आपली प्रतिक्रिया देत, ‘विराट आयपीएलसाठी असे करुच शकत नाही’, असे म्हटले आहे.
Virat Kohli will never, even for the IPL, forfeit a Test series. There's absolutely no chance of him saying that 'end the series in a draw, we are happy with it'.
Not Virat Kohli.. never.
— Kanav Bali🏏 (@Concussion__Sub) September 10, 2021
BCCI doesn't miss to send a copyright strike for simple videos that we put here on Twitter. You think they would forfeit a Test match just like that?
— Ricky talks Cricket (@CricRicky) September 10, 2021
#ManchesterTest #ENGvIND
We are waiting for 5th Test but ….?5th Test Postponed pic.twitter.com/9FHorOyie0
— Gaurav Chaudhary (@thegauravjaat) September 10, 2021
BCCI admin amid the forfeit news outbreak: pic.twitter.com/VPrqDsgkLM
— ComeOn Cricket 🏏🇮🇳 (@ComeOnCricket) September 10, 2021
दरम्यान जेव्हा भारतीय संघातील सपोर्ट स्टाफला कोरोनाचे संक्रमण झाले. त्यानंतर इसीबीने भारतीय संघासमोर मालिका २-२ ने बरोबरीत ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र याला कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सरळ सरळ धुडकावून लावले होते.
महत्वाच्या बातम्या –
–चार वर्षांनंतर अश्विनचे टी२०त पुनरागमन; कर्णधार, प्रशिक्षक किंवा निवडकर्ते नव्हे ‘या’ शिलेदाराचा हात
–धोनीपुढे मोठा पेच, टी२० विश्वचषकात भारताचा मार्गदर्शक बनण्यासाठी सोडावी लागणार सीएसकेची साथ!
–फॉर्मात असूनही टी२० विश्वचषकासाठी लागली नाही पृथ्वी शॉची वर्णी, ‘या’ खेळाडूमुळे भंगले स्वप्न