शुक्रवारी (26 मे) मुंबई इंडियन्सला पराभूत करून गुजरात टायटन्सने आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात आपली धडक दिली. मुंबई इंडियन्सला या सामन्यात 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुजरातच्या विजयात शुबमन गिल याचे योगदान सर्वात मोठे राहिले. गिलने अवघ्या 60 चेंडूत 129 धावा कुटल्या होत्या. सोबतच गोलंदाजी विभागातील मोहित शर्मा, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांनी अप्रतिम प्रदर्शन केले.
लखनऊकडे मुंंबईला विजायासाठी 234 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांना गाठता आले नाही. मुंबईच्या विजयासाठी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी प्रयत्न केले. मात्र, या दोगांनी अनुक्रमे 61 आणि 43 धावांवर विकेट्स गमावल्या. कर्णधार रोहित आणि निहाल वढेरा संघाला अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाहीत. 18.2 षटकांमध्ये 171 धावांवर मुंबईच्या सर्व खेळाडूंनी विकेट्स गमावल्या आणि गुजरातचे अंतिम सामन्यातील स्थान पक्के झाले.
शुबमन गिलनंतर गुजरातच्या विजाचा दुसरा सर्वात मोठा हिरो ठरला तो मोहित शर्मा. वेगवान गोलंदाजाने टाकलेल्या 2.2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव, विष्णू विनोद, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला आणि कुमार कार्तिकेय या पाच विकेट्स मोहित शर्माने घेतल्या. मोहम्मद शमी आणि राशिद खा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
गुजरातसाठी शुबमन गिलप्रामाणे साई सुदर्शन देखील चांगले प्रदर्शन करत होता. पण 31 चेंडूत 41 धावा करून तो रिटायर्ड हर्ट झाला. दुसरीकडे मुंबईसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कॅमरून ग्रीनलाही दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पंड्याचा चेडू हाताला लागल्यामुळे ग्रीन रियाटर्ड हर्ट झाला होता. पण तिलकची विकेट गेल्यानंतर तो पुन्हा खेळपट्टीवर आला आणि 20 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. गुजरात टायटन्स या विजयानंतर रविवारी (28 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल 2023चा अंतिम सामना खेळेल.(After defeating Mumbai Indians, Gujarat Titans entered the final match of IPL 2023)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनने ऐकला नाही गावसकरांचा सल्ला, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…
प्लेऑफ सामन्यात रोहित पुन्हा फेल, संघ अडचणीत असताना कर्णधार नेहमीप्रमाणे स्वस्तात बाद, पाहा आकडेवारी