भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या वादळ आले आहे. हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक (Hardik Pandya Divorce) एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले आहेत. हार्दिकने गुरुवारी (18 जुलै) त्याच्या घटस्फोटाची घोषणा केली. मे 2020मध्ये हार्दिकने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले होते. मात्र अवघ्या 4 वर्षांतच त्यांचा संसार मोडला. मात्र घटस्फोटाच्या दोन दिवसांनंतरच हार्दिकने आता इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. या बॉलिवूड अभिनेत्रीने सुद्धा हार्दिकला फॉलो बॅक केले आहे.
यावरुन आता सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. हार्दिकने नेमके कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीला फॉलो केले आहे? ही अभिनेत्री कोण आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडू लागले आहेत.
नताशा बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिकने बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडेला (Ananya Pande) फॉलो करायला सुरुवात केली आहे. अनन्या आणि हार्दिकने इन्स्टाग्रामवर परस्पांना फॉलो केले आहे. सोशल मीडिया युजर्सनी त्यावरुन आता विविध चर्चा सुरु केल्या आहेत. फॉलो केलं म्हणून काय झालं? असं काहींच म्हणणं आहे. काहींनी असं सुद्धा म्हटलय, हार्दिक घटस्फोट होण्याची वाट पाहत होता.
अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिकने अनन्यासोबत केला होता धम्माल डान्स
मागच्या आठवड्यात प्रसिद्ध भारतीय उद्योगपती अनंत अंबानी यांच्या लग्नात हार्दिक आणि अनन्या एकमेकांसोबत डान्स करताना दिसले होते. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होत्या, ज्यात दोघे डान्स, धमाल मस्ती करताना दिसले होते. त्यानंतरच हार्दिक आणि अनन्याच नाव जोडले जात आहे. असे असले तरीही, अनन्या बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. ते दोघे बऱ्याचदा एकत्र वेळ घालवतानाही दिसले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादववर! कर्णधार बनवण्यासाठी प्रयत्न करतील या 3 आयपीएल फ्रँचायजी
एकच मन किती वेळा जिंकशील स्मृती! भारतीय सलामीवीर मंधानाचं जगभरात होतंय कौतुक
“त्यांची कारकीर्द…” रोहित-विराटबद्दल भारताच्या गोलंदाजानं केलं मोठं वक्तव्य