आयपीएल २०२१ च्या ३९ व्या सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रविवारी (२६ सप्टेंबर) खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने मुंबईवर ५४ धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्स संघासाठी हा आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सलग तिसरा पराभव ठरला आहे. आरसीबीच्या फलंदाजांनी सामन्यात चांगली फलंदाजी केलेली पाहायला मिळाली. आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरततही चांगल्या लयीत दिसला, पण तो मुंबईच्या राहुल चाहरच्या गोलंदाजीवर ३२ धाव करून बाद झाला. भरतची विकेट घेतल्यानंतर चाहर खूप रागात या विकेटचा जल्लोश करताना दिसला.
आरसीबीने पहिल्या आठ षटकात १ विकेटच्या बदल्यात ६३ धावा केल्या होत्या. ९ व्या षटकात फिरकी गोलंदाज राहुल चाहर गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी विराट कोहली आणि श्रीकर भरत हे खेळपट्टीवर होते. राहुलच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराटने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवरही विराटने कट शाॅट खेळला आणि चेंडू पाॅईंटला थांबलेल्या हार्दिक पांड्याकडे आला, पण त्याकडून तो झेल चुकला आणि विराटने त्यावेळी तेथे एक धाव घेतली.
विराटचा झेल सुटल्यानंतर चाहर नाराज झालेला दिसला होता. त्यानंतर चाहरच्या पुढच्या चेंडूवर भरतने षटकार मारला आणि चहरच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यावेळी भरत सेलीब्रेशन करताना दिसला होता.
राहुलच्या पुढच्या चेंडूवर मात्र, भरतने चुकीचा शाॅट खेळला आणि वाइड लाँग ऑफवर उभा असलेल्या सूर्यकुमार यादवच्या हातात त्याने झेल दिला. सूर्यकुमारने यावेळी काहीही चूक न करता तो झेल पकडला आणि राहुलला भरतची विकेट मिळवून दिली.
सूर्यकुमारने भरतचा झेल घेतल्यानंतर चाहर चिडलेला पाहायला मिळाला. आधीच्या चेंडूवर भरतने केलेले सेलीब्रेशन त्याला आवडले नव्हते. तो विकेट मिळाल्यामुळे आनंदी तर होता मात्र, त्याच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा राग दिसत होता आणि त्याने राहुलचा विकेट घेऊन षटकात केलेल्या धुलाईचा बदला घेतल्यासारखे वाटत होते. विकेट मिळवल्यानंतर त्याने ज्याप्राकने जल्लोश केला त्याचा व्हिडिओ सध्या समोर येत आहे. या व्हिडिओत भरतची विकेट मिळाल्यानंतर राहुलने दिलेली प्रतिक्रिया स्पष्ट दिसत आहे.
https://twitter.com/CowCorner9/status/1442145322763907076?s=20
दरम्यान, सामन्यात विराटचा झेल सुटला नसता तर विराटही चाहरचा शिकार ठरला असता. चाहरने भरत आणि विराटची भागीदारी ६८ धावांवर मोडली. चाहरला या सामन्यात केवळ एक विकेट मिळाली असून तो संघासाठी अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. तसेच तो फायदेशीर गोलंदाजीही करू शकला नाही. त्याला ग्लेन मॅक्सवेलने अनेकदा रिवर्स स्वीप शाॅट खेळले. राहुलने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ३३ धावा दिल्या आणि केवळ १ विकेट मिळवली.
महत्त्वाच्या बातम्या-
गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहचलेल्यानंतर सीएसकेचा कर्णधार धोनी म्हणतोय, आम्ही…
धमाका! पुढील वर्षीच्या आयपीएल लीलावात ‘या’ पुणेकरासह पाच प्रतिभावान खेळाडू होणार मालामाल
हृदय जिंकलस! टीम इंडिया आधी आयपीएलमधील वैर नंतर; विराटची निराश झालेल्या इशान अन् रोहितशी भेट