---Advertisement---

श्रीलंकेला क्लीन स्वीप देत भारताने लावली विक्रमांची रांग! मायदेशात सर्वाधिक विजयाबरोबरच ‘हे’ पराक्रमही नावावर

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 4:23 PM
Team-India
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 Series) यांच्यातील टी-२० मालिकेचा शेवटचा सामना रविवारी (२७ जानेवारी) खेळला गेला. भारताने या सामन्यात ६ विकेट्स राखून विजय मिळवला. मालिकेतील भारतीय संघाने मिळवलेला हा सलग तिसरा विजय होता. त्यामुळे श्रीलंकेला क्लीन स्वीप मिळाला. या विजयानंतर भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत.

भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना खेळलेला हा इतिहासातील ७५ वा टी२० सामना होता. या सामन्यांपैकी ५४ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारत अव्वल क्रमांकावर आला आहे.

भारताव्यतिरिक्त इतर कोणताही संघ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना ५४ सामने जिंकलेला नाहीय. पाकिस्तान या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी ५३ टी-२० सामने जिंकले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया ५१ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या महत्त्वाच्या विक्रमाव्यतिरिक्त रविवारच्या सामन्यांनंतर भारतीय संघाने अनेक महत्वाचे विक्रम केले आहेत.

भारतीय संघ आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक लागोपाठ विजय मिळवणारा संघ बनला आहे. या यादीत भारत, अफगाणिस्तान आणि रोमानिया हे तीन संघ पहिल्या क्रमांकावर आहेत. या तिन्ही संघांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी १२ सामने लागोपाठ जिंकले आहेत.

अजून एक महत्त्वाचा विक्रम म्हणजे, भारताने मायदेशात खेळलेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांपैकी ४० सामने जिंकले आहेत, जे सर्वाधिक आहेत. इतर कोणताही संघ स्वतःच्या मायदेशात एवढे आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकू शकलेला नाही. तसेच श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा १७ टी-२० विजय होता. एकाच विरोधी संघाला १७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये पराभूत करणारा भारत जागतिक क्रिकेटमधील एकमेव संघ आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे ही जबाबदारी आली. रोहित या जबाबदारीला पूर्णपणे पात्र ठरत आहे. त्याच्या नेतृत्वाता भारताने मागच्या तीन टी-२० मालिका खेळल्या आणि तिन्हीमध्ये विरोधी संघाला क्लीन स्वीप दिला. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या विजयाच्या रथावर आरुढ आहे. कर्णधार रोहित शर्माची टी-२० क्रिकेटमध्ये विजय मिळवण्याची सरासरी सध्या ८५.७१ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या –

प्रायवेट पार्टवर चेंडू लागूनही वेंकटेशन अय्यरने घेतला महत्त्वाचा झेल, पाहा व्हिडिओ

रोहित कर्णधाराच्या रुपात सुपरहिट, पण फलंदाज म्हणून केलाय ‘हा’ नकोसा विक्रम

‘फायर है मैं’, श्रीलंकेविरुद्ध अप्रतिम प्रदर्शनानंतर श्रेयस अय्यर सोशल मीडियावर ट्रेंड; मीम्स होतायेत व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---