पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडी येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अझहर अली १३७ धावांची खेळी करत आहे. अझहरने शानदार फलंदाजी करत २५७ चेंडूत शतक झळकावले आहे. त्याने १८५ धावा केल्या. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे १९वे शतक आहे. रावळपिंडी कसोटीतील पाकिस्तानचे हे दुसरे शतक आहे. याआधी सलामीवीर इमाम-उल-हकने १५७ धावा केल्या होत्या. या दोन खेळाडूंनी २०८ धावांची मोठी भागीदारी करत पाकिस्तानला चांगल्या स्थितीत आणले आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अझर अलीने (Azhar Ali) शनिवारी (५ मार्च) ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना थक्क केले. पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अझहर अली आता पहिल्या ५ खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. पाकिस्तानकडून इमाम-उल-हकने दमदार खेळी केली. त्याने दीड दिवस फलंदाजी केली. यादरम्यान तो क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये आपली सर्वोच्च धावसंख्या बनवू शकला.
इमाम ३५८ चेंडूत १५७ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने १६ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या कारकिर्दीतील हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी ७६ धावा ही त्याची सर्वोत्कृष्ठ धावसंख्या होती. २४ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला या स्पर्धेत टिकून राहणे सोपे जाणार नाही. पाकिस्तानने १६२ षटकांत ४ बाद ४७६ धावा करत डाव घोषित केला आहे. ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. बाबर आझमने ३६ धावा केल्या.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे ४ मार्च ते ८ मार्चपर्यंत खेळला जाणार आहे. १२ ते १६ मार्चदरम्यान दुसरा सामना कराची येथे खेळला जाणार आहे, तर २१ ते २५ मार्च दरम्यान लाहोर येथे तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यानंतर पहिला, दुसरा, तिसरा एकदिवसीय सामने अनुक्रमे २९ मार्च, ३१ मार्च आणि २ एप्रिल रोजी खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने रावळपिंडी येथे पार पडणार आहेत. तसेच ५ एप्रिलला एकमेव टी२० रावलपिंडी येथे पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत
तू सर्वोत्तम ठरला! पॉंटिंगकडून वॉर्नला भावूक शब्दांत श्रद्धांजली
वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील ‘हा’ दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर






