---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर रिषभ पंतने आपल्या चुकांवर केली मोकळेपणाने चर्चा; म्हणाला, ‘आता…’

On: सोमवार, मार्च 14, 2022 11:39 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND VS SL) यांच्यामध्ये बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नुकतीच दोन सामान्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) या मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याला मालिकेचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. या सामन्यानंतर रिषभ पंतने मोठे वक्तव्य केले आहे.

रिषभ पंत (Rishabh Pant) म्हणाला की, “खेळाडू म्हणून आम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. माझ्याकडून यापूर्वी अनेक चुका झाल्या आहेत, पण आता मी त्या सतत सुधारणा करत आहे. माझी रणनीती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. एम. चिन्नास्वामी स्टेडिअममधील खेळपट्टी खडतर होती. मी गोलंदाजांना त्रास देण्याचा आणि सातत्याने फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला. मला वाटते की, हे सर्व आत्मविश्वासावर आहे. पूर्वी मी खूप विचार करायचो की, काहीही चुकू नये, परंतु आता मी माझे पूर्ण लक्ष वर्तमानावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो.”

बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा २३८ धावांनी पराभव केला . या विजयासह भारताने ही मालिका २-० ने आपल्या नावे केली आहे. या पराभवामुळे श्रीलंकेची भारत दौऱ्यावर असतानाची विजयाची ४० वर्षांपासूनची प्रतीक्षा आजही अपूर्णच राहिली. भारत दौऱ्यावर असताना श्रीलंका संघाला एकदाही कसोटी सामन्यात भारताला पराभूत करता आलेले नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यात भारतात एकूण २२ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यातील १५ सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत, परंतु श्रीलंकेने एकही सामना जिंकलेला नाही.

दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्या डावात एकूण २५२ धावा केल्या. भारताने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने १०९ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ९ बाद ३०३ धावांवर डाव घोषित केला. अशाप्रकारे श्रीलंकेसमोर एकूण ४४७ धावांचे आव्हान ठेवले. श्रीलंका संघ दुसऱ्या डावात २०८ धावा करू शकला. यामुळे श्रीलंकेला २३८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाचा कर्णधार करुणारत्नेने १०७ धावांची शतकी खेळी केली, परंतु त्याने संघाला विजय मिळवून दिला नाहो.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या ३४ कसोटी कर्णधारांना जे जमलं नाही, ते रोहितने पहिल्याच कसोटी मालिकेत ‘करुन दाखवलं’

भयानक.! भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या

WTC Point Table: श्रीलंकेला धूळ चारल्याने भारताला मोठा फायदा, सलग दुसऱ्यांदा खेळू शकतो अंतिम सामना; घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---