भारतीय दौरा श्रीलंकेसाठी खूपच खराब ठरला. आधी ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत आणि त्यानंतर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, असे असले, तरीही श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ रत्नेसाठी कसोटी मालिकेतील दुसरा सामना खास ठरला. त्याने एकाकी झुंज देत शतक झळकावले आणि खास विक्रम आपल्या नावावर केला.
दिमुथ करुणारत्नेचा विक्रम
दिमुथ करुणारत्नेने (Dimukh Karunaratne) त्याच्या ७५ व्या कसोटी सामन्यात कारकीर्दीतले १४ वे शतक झळकावले. विशेष म्हणजे, श्रीलंका संघाकडून या मालिकेत शतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हजारो प्रेक्षक विराट कोहलीच्या (Virat Kohli) ७१ व्या शतकाकडे आस लावून बसले होते. मात्र, विराटला शतक ठोकता आले नाही. त्यानंतर तिसऱ्या दिवशी श्रीलंकन कर्णधाराने अफलातून शतक ठोकले. भारतीय संघाकडून ४४७ धावांच्या आव्हानाचा सामना करताना करुणारत्नेने एका बाजूने मोर्चा सांभाळला.
करुणारत्नेच्या या उत्कृष्ट शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने या मालिकेत प्रथमच २०० धावांचा टप्पा पार केला. मात्र, तो त्याच्या डावात फारशी प्रगती करू शकला नाही आणि पुढच्याच षटकात बुमराहने करुणारत्नेला सुंदर इन-स्विंगवर बोल्ड केले. श्रीलंकेच्या कर्णधाराने १७४ चेंडूंत १०७ धावा केल्या. श्रीलंकेकडून बाद होणारा तो सातवा फलंदाज ठरला.
What.A.Knock ????
Brilliant from Dimuth Karunaratne to bring up his ???? on a difficult pitch! This is his 14th in Test Cricket.#INDvSL pic.twitter.com/mH2wZBOYov
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) March 14, 2022
या शतकामुळे करुणारत्नेचे कसोटी आकडे चांगले झाले. सलामीवीर म्हणून श्रीलंकेसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याची सर्व शतके सलामीला फलंदाजी करताना आली आहेत. त्यापुढे श्रीलंकेचा माजी कर्णधार मारवान अटापट्टू (१६) आहे. एवढेच नाही तर दिवस-रात्र कसोटीच्या इतिहासात एकाहून अधिक शतके करणारा तो केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. हे त्याचे दुसरे शतक ठरले.
२०१८ नंतर भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे परदेशी कर्णधार
भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी कर्णधारांमध्ये करुणारत्ने दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जो रूट आहे. त्याने २०२१ साली भारताविरुद्ध सर्वाधिक २१८ धावा ठोकल्या होत्या. यानंतर संयुक्तरीत्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे. त्याने २०१९ साली अनुक्रमे ६४ आणि ५५ धावा केल्या होत्या. तसेच, २०१८ साली वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरने ५२ धावा केल्या होत्या.
भारताने २३८ धावांनी जिंकला दुसरा कसोटी सामना
भारताने श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम कसोटीत २३८ धावांनी विजय मिळवत मालिका खिशात घातली. श्रीलंका संघ दुसऱ्या डावात २०८ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने एकाकी झुंज देत १०७ धावा कुटल्या. कर्णधाराव्यतिरिक्त कुशल मेंडिसने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. मात्र, या दोघांव्यतिरिक्त एकाही खेळाडूला २० धावांचा आकडा पार करता आला नाही आणि श्रीलंका संघाने १० विकेट्स गमावत २०८ धावांवरच नांगी टाकली. यावेळी भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह ३, अक्षर पटेल २ आणि रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली.
२०१८ नंतर भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे परदेशी कर्णधार
२१८- जो रूट (२०२१)
१०७*- दिमुथ करुणारत्ने (२०२२)
६४ – फाफ डु प्लेसिस (२०१९)
५५ – फाफ दु प्लेसिस (२०१९)
५२- जेलन होल्डर (२०१८)
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितसेनेचा ऐतिहासिक विजय.! निर्णायक कसोटीत श्रीलंकेला २३८ धावांनी धूळ चारत रचला इतिहास
आर अश्विनचा डेल स्टेनला ‘४४०’चा झटका, अद्वितीय कारकिर्दीत जोडली आणखी एक सोनेरी किनार