बुधवारी (३ नोव्हेंबर) आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत आणि अफगानिस्तान हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ म्हणून पहिल्या जाणाऱ्या भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. अफगानिस्तान संघाला ६६ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. या विजयानंतर हॅशटॅग ‘फिक्समॅच’ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.
भारतीय संघाने पहिल्या २ सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. तर अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत जोरदार पुनरागमन केले आणि स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक तर होत आहे,परंतु अनेकांनी हा सामना फिक्स असल्याचे देखील म्हटले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली कथितरित्या मोहम्मद नबीला प्रथम गोलंदाजी कर असे सांगताना दिसून येत आहे. तर अनेकांनी ट्विट करत हा सामना फिक्स असल्याचे म्हटले आहे. एका युजरने ट्विट करत म्हटले की, “अखेर भारतीय संघाला विजय खरेदी करवण्यात यश आले.. वेल पेड इंडिया.”
तर दुसऱ्या एका युजरने अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीचा सामना झाल्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने “इफ फिक्सिंग हॅड अ फेस.” असे लिहिले आहे. तसेच आणखी एका युजरने लिहिले की,” फिक्स सामना असा असतो. खेळाडूंच्या देह बोलीवरून सर्व दिसून येत आहे. तुम्हाला लाज वाटायला हवी.”
काहींनी सामना फिक्स असल्याचे म्हणणाऱ्या युजर्सला फटकारले देखील आहे. काहींनी म्हटले आहे की प्रत्येक नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला आपला निर्णय दुसऱ्या कर्णधाराला सांगावाच लागतो. काहींनी म्हटले आहे की भारतीय संघावर जळू नका.
https://twitter.com/_junaid_elahy_/status/1455967798870556672?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1455967798870556672%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcdn.embedly.com%2Fwidgets%2Fmedia.html%3Ftype%3Dtext2Fhtmlkey%3Dfd92ebbc52fc43fb98f69e50e7893c13schema%3Dtwitterurl%3Dhttps3A%2F%2Ftwitter.com%2F_junaid_elahy_%2Fstatus%2F1455967798870556672image%3Dhttps3A%2F%2Fabs.twimg.com%2Ferrors%2Flogo46x38.png
https://twitter.com/KokoUmar00/status/1455948874355560450?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1455948874355560450%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcdn.embedly.com%2Fwidgets%2Fmedia.html%3Ftype%3Dtext2Fhtmlkey%3Dfd92ebbc52fc43fb98f69e50e7893c13schema%3Dtwitterurl%3Dhttps3A%2F%2Ftwitter.com%2Fkokoumar00%2Fstatus%2F1455948874355560450image%3Dhttps3A%2F%2Fabs.twimg.com%2Ferrors%2Flogo46x38.png
https://twitter.com/sameerch66/status/1456129427839098885
https://twitter.com/oye_monayyy/status/1455964162245419014
https://twitter.com/IAhmadShan/status/1455959222655537152
https://twitter.com/mr_rajvaniya/status/1455954957782306816
https://twitter.com/awaisb4uwah/status/1455980176936996867
https://twitter.com/Aviatoryin18/status/1456120471041150976
https://twitter.com/WhyJustsaying/status/1455946664884068360
https://twitter.com/technoajaygarg/status/1456110755216957444
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २ बाद २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाला ७ बाद १४४ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानला पोटशूळ! म्हणे भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स; भारतीय चाहत्यांनी केली तोंडे बंद
‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोव्हर सोबत ‘सुर्यवंशी’मध्ये झळकणार महेंद्रसिंग धोनी? ‘या’ गोष्टीमुळे चर्चेला उधाण
क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू