---Advertisement---

ईशानच्या द्विशतकानंतर संपणार ‘या’ खेळाडूची कारकीर्द? दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य

On: रविवार, डिसेंबर 11, 2022 8:18 PM
Dinesh-Karthik
---Advertisement---

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताने पराभव स्वीकारला, पण शेवटच्या वनडे सामन्यात मात्र संघाने मोठा विजय मिळवला. शेवटच्या वनडे सामन्यात ईशान किशन मॅच विनर ठरला. त्याने 131 चेंडूत 210 धावा केल्या आणि अनेक विक्रम देखील नावावर केले. ईशानच्या या जबरदस्त खेळीनंतर त्याला संघात नियमित संधी देण्यासाठी मागण्या होऊ लागल्या आहेत. भारताचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज याच्या मते ईशान किशनच्या या वादळी प्रदर्शनानंतर संघातील एका फलंदाजाची जागा धोक्यात आली आहे. 

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या संघातून बाहेर आहे. ईशान किशन (Ishan Kishan) याने शनिवारी (10 डिसेंबर) बांगलादेशविरुद्ध केलेेल्या वादळी खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ईशानचे कौतुक करणाऱ्यांमध्ये कार्तिक देखील सहभागी झाला आहे. कार्तिकने ईशान किशनमुळे संघातील जागा धोक्यात आलेल्या फलंदाजाचे नाव देखील उघड केले. त्याच्या मते इशान आगामी काळात शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या जागी संघात खेऊ शकतो. धवन मागच्या काही सामन्यांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये आणि याच पार्श्वभूमीवर कार्तिकने ही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना कार्तिक म्हणाला की, “श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शिखर धवनची भूमिका काय असेल, हे पाहावे लागेल. ईशान किशनला संघातून कशाच्या आधारे बाहेर ठेवले जाते हे पाहणे औत्सुक्याचे असेल. शुबमन गिल देखील चांगले प्रदर्शन करत आहे. जर रोहित शर्मा उपलब्ध असेल, तर कोणा एकाला तरी संघातून बाहेर बसावे लागेलच. शक्यतो तो धवन असू शकतो. हा त्याच्या अप्रतिम कारकिर्दीचा दुर्दैवी शेवट असू शकतो. मात्र, असे झाल्यास निवडकर्त्यांना काही प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील.”

दरम्यान, शनिवारी बांगलादेशविरुद्ध केलेल्या द्विशतकानंतर ईशान किशनच्या नावावर काही महत्वापूर्ण विक्रम नोंदवले गेले. ईशान वनडे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सातवा, तर भारतातील चौथा फलंदाज ठरला आहे. भारतीय संघातील सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक केले होते. दरम्यान मागच्या काही सामन्यांमध्य भारताच्या सलामीवीर जोड्यांमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. अशातच ईशानने हे द्विशतक ठोकत संघात आगामी काळात संधी मिळण्यासाठी दरवाजे ठोठावले आहेत. (After Ishan Kishan’s double century, Shikhar Dhawan’s place in the team will be in jeopardy said Dinesh Karthik)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘आता 200 धावा केल्या आहेत…’, विश्वचषकातील निवडीच्या प्रश्नावर ईशानचे मोठे वक्तव्य
वाघ म्हातारा जरी झाला तरी शिकार करणे विसरत नाही, ब्रायन लारांनी घेतला राशिद खानचा चांगलाच समाचार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---