---Advertisement---

भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला ‘बापमाणूस’, बाळाचं नावही केलं जाहीर

On: मंगळवार, फेब्रुवारी 21, 2023 2:39 PM
Mitchell-Swepson
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. मात्र, यादरम्यान ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के बसताना दिसले. नुकताच कर्णधार पॅट कमिन्स वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला. आता डेविड वॉर्नर हादेखील उर्वरित दोन सामन्यांतून बाहेर पडला. यांच्यापूर्वी मिचेल स्वेप्सन पहिल्यांदा वडील बनल्यामुळे मायदेशात परतलेला. आता याच स्वेप्सनने त्याच्या मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.

मिचेल स्वेप्सन इंस्टाग्राम पोस्ट
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू मिचेल स्वेप्सन (Mitchell Swepson) हा मागील आठवड्यात 16 फेब्रुवारी रोजी वडील बनला. स्वेप्सनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो म्हणाला आहे की, “तू आमची मने चोरलीस बाळा.” विशेष म्हणजे, स्वेप्सन याने मुलाचे नावही जाहीर केले आहे. त्याने मुलाचे नाव जॉन स्वेप्सन (John Swepson) असे ठेवले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये चार फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/Co1D_H9BiU5/?utm_source=ig_embed&ig_rid=cd363179-d929-4bcd-81f4-500fab2c0293

स्वेप्सन याने ही पोस्ट शेअर करताच, त्याच्या पोस्टवर चाहते आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. उस्मान ख्वाजा आणि त्याची पत्नी रॅचेल, ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रमन, यांच्यासोबतच इतरांनी स्वेप्सनच्या पोस्टवर कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) कसोटीबद्दल बोलायचं झालं, तर मालिकेत भारत 2-0ने आघाडीवर आहे. नागपूर आणि दिल्ली कसोटी जिंकून भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) आपल्याकडे ठेवली आहे. अशात भारत पुढील सामन्यांमध्येही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

स्वेप्सन हा भारत दौऱ्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात सामील आहे. त्याने यातील एकही सामना खेळला नाहीये. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत टॉड मर्फी, मॅथ्यू कुह्नेमन आणि नेथन लायन यांना संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार परतला मायदेशी
ऑस्ट्रेलियाला एकापाठोपाठ एक पराभव मिळाले. त्यांनी आधीच ही मालिका गमावली आहे. अशात त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) हादेखील ऑस्ट्रेलियाला परतला आहे. 29 वर्षीय कमिन्स त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे घरी परतला असल्याचे सांगितले जात आहे. तो 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी संघात परतण्याची शक्यता आहे. (After leaving India Tour in middle Mitchell Swepson welcomes son John see post)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज
ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के! ‘हा’ विस्फोटक खेळाडू आख्ख्या मालिकेतूनच पडला बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---