आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना क्रिकेटमध्ये नाव कमवू वाटणारे तरुण आदर्श मानतात. त्यापैकीच एक म्हणजे भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली होय. विराटने आजपर्यंत अनेक विक्रमांचे मनोरे रचले आहेत. तो देशभरातील अनेक युवा खेळाडूंना प्रोत्साहित करतो. त्याच्या पावलांवर पाऊल टाकून अनेक खेळाडू क्रिकेटमध्ये आपली नवी ओळख बनवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टी20, कसोटी, वनडे आणि आयपीएलमध्ये शतक झळकावणारा शुबमन गिल. गिलने सोमवारी (दि. 15 मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलमधील आपले पहिले-वहिले शतक झळकावले. यानंतर कौतुक करत शुबमन गिलने विराट कोहलीला प्रेरणा म्हटले.
‘विराट भाईकडून खूप काही शिकलो’
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाविरुद्ध शुबमन गिल (Shubman Gill) याने 58 चेंडूत 101 धावांचा पाऊस पाडला. त्याने या खेळीत 1 षटकार आणि 13 चौकारही मारले. या खेळीनंतर गिलने विराट कोहली (Virat Kohli) याची प्रशंसा करत त्याला आदर्श म्हटले. तो म्हणाला की, तो 12-13 वर्षांच्या वयापासूनच विराटला फॉलो करत आहे. क्रिकेटची जाण झाल्यानंतर विराटच त्याच्यासाठी आदर्श आहे. त्याने विराटकडून खूप काही शिकले आहे. तो असेही म्हणाला की, विराटची फलंदाजी, त्याचे समर्पण आणि धैर्य हे त्याला प्रेरित करते.
सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी चर्चा करताना गिल म्हणाला की, “जेव्हा मी 12-13 वर्षांचा होतो, तेव्हापासून मी विराट कोहली भाईला सर्वाधिक फॉलो केले. जेव्हापासून मला क्रिकेट कळायला लागले, तेव्हापासून तो माझा आदर्श आहे. मी विराट भाईकडून खूप काही शिकलो आहे. त्याची फलंदाजी आणि धैर्य तसेच कटिबद्धता मला प्रेरित करते.”
https://twitter.com/IPL/status/1658174712722362369
शुबमन गिलने गुजरातसाठी पूर्ण केल्या 1000 आयपीएल धावा
शुबमन गिल आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 576 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने शतकही ठोकले आहे, जे त्याने हैदराबादविरुद्ध केले होते. तो गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघासाठी 1000 धावा करणारा पहिला खेळाडूही बनला आहे. (after maiden century shubman gill says virat kohli motivates me has been my idol since chilhood)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराजच्या नवीन घरी आख्ख्या आरसीबी टीमने लावली हजेरी, ‘हैदराबादी बिर्याणी’चाही लुटला आनंद; पाहा फोटो
प्ले-ऑफच्या शर्यतीतून हैदराबाद बाहेर, पराभवानंतर मार्करमने वाचला चुकांचा पाढा; म्हणाला…






