बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला वनडे सामने रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली. ज्यामध्ये भारताच्या संघात दोन महत्वाचे बदल दिसले. पहिला बदल म्हणजे कुलदीप सेन याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तर रिषभ पंत हा संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) बाहेर झाल्याने आधीच संघ अडचणीत आला होता, मात्र उमरान मलिक (Umran Malik) याला त्याच्या जागी घेतल्याने काही प्रमाणात संकट टळले आहे. पहिल्या वनडेमध्ये विकेटकीपर म्हणून केएल राहुल (KL Rahul) याला संधी मिळाली आहे. अक्षर पटेल हा पण काहीसा फिट नाही. त्याला सराव करताना छातीवर चेंडू लागला होता.
पंतबाबत अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्वीट करत दिली. वैद्यकीय पथकासोबत चर्चा केल्यानंतरच पंतला मालिकतून वगळले आहे, अशी माहिती समोर येत आहे. या मालिकेत त्याची जागा कोण घेणार हे जाहीर केले नसून त्याची आवश्यकताही जाणवत नाही, कारण संघात राहुलबरोबर इशान किशन हा पण उपलब्ध आहे.
🚨 UPDATE
In consultation with the BCCI Medical Team, Rishabh Pant has been released from the ODI squad. He will join the team ahead of the Test series. No replacement has been sought
Axar Patel was not available for selection for the first ODI.#TeamIndia | #BANvIND
— BCCI (@BCCI) December 4, 2022
पंत कसोटी मालिकेत परतणार आहे. त्याने न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे आणि टी20 मालिकेत काही खास कामगिरी केली नव्हती. यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या होत्या. बांगलादेशच्या दौऱ्यात भारत दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यातील पहिला सामना 14 डिसेंबरला चट्टोग्राम येथे आणि दुसरा सामना 22 डिसेंबरला ढाका येथे खेळला जाणार आहे.
हे दोन्ही कसोटी सामने आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या स्पर्धेचे भाग आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये ओव्हलवर खेळला जाणार आहे. त्या सामन्यात पोहचण्याची भारताला संधी आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध दोन आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सर्व चारही सामने जिंकले तरच भारत अंतिम फेरीत पोहचेल.After Mohammed Shami, Rishabh Pant also out of ODI series v BAN, BCCI itself stated the reason
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटला बदनाम करणारे माईक डेनिस: ज्यांनी केलेली अर्धी टीम इंडिया बॅन
आनंदाची बातमी! फुटबॉल दिग्गज पेलेंच्या तब्येतीत सुधारणा, इंस्टाग्रामवर शेअर केली भावूक पोस्ट