सध्या जगभरात फुटबॉल विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. कतार येथे सुरू असलेल्या या स्पर्धेचे साखळी सामने संपले असून, उपउपांत्यपूर्व फेरीचे दोन सामने खेळले गेले. त्याचवेळी फुटबॉल तसेच संपूर्ण क्रीडाविश्वाला चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली ती म्हणजे ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू व फुटबॉलचे सम्राट मानल्या जाणाऱ्या पेले यांची प्रकृती ढासळल्याची. आता त्यांच्या प्रकृतीचे अपडेट पुढे आले आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे समोर येत आहे.
पेले यांना कॅन्सरचे निदान झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय पेले यांच्यावर कॅन्सर रुग्णांसाठी केली जाणारी किमोथेरपी सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांना पॅलिएटीव केअरमध्ये ठेवले गेले. त्यांना सध्या श्वसनाचा त्रास होत असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार नाही.
पेले यांना साओ पाउलोच्या अल्बर्ट आइन्स्टाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृत्तीत सुधारणा होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पेले यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली.
पेले यांनी पोस्टमध्ये म्हटले, “माझ्या मित्रांनो, मला सर्वांना शांत आणि सकारात्मक ठेवायचे आहे. मी आशेने मजबूत आहे आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या उपचारांचे पालन करतो. मला मिळालेल्या सर्व काळजीबद्दल मी संपूर्ण वैद्यकीय आणि नर्सिंग टीमचे आभार मानू इच्छितो. माझा देवावर खूप विश्वास आहे आणि तुमच्याकडून मला जगभरातून मिळणारा प्रेमाचा प्रत्येक संदेश माझ्यात ऊर्जा भरून ठेवतो आणि विश्वचषकातही ब्राझीलला खेळताना पाहिले. सर्वांचे धन्यवाद.”
पेले यांना 30 नोव्हेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेव्हा त्यांच्या मुलीने इंस्टाग्राम पोस्टमार्फत त्यांची प्रकृती गंभीर नसून ठिक आहे. शुक्रवारी (2 डिसेंबर) कॅमेरून विरुद्ध ब्राझील सामना खेळला गेला, ज्यामध्ये चाहत्यांनी त्यांची आठवण काढली. फिफाने देखील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
पेले यांनी अवघ्या 17व्या वर्षी ब्राझीलला विश्वचषक जिंकून दिली. त्यांनी 1958मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सूदान विरुद्ध दोन गोल केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तीन (1958, 1962 आणि 1970) विश्वचषक जिंकले आहेत. कारकिर्दीत त्यांनी एकूण 1363 सामने खेळताना 1281 गोल आणि ब्राझीलकडून 92 सामन्यांमध्ये 77 गोल केले. footballer Pele Health Update Hospital & Instagram Post FIFA World Cup 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 18: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित आगरकर
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली