भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामना खेळत आहेत. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून याठिकाणी संघाला एकूण 10 सामने खेळायचे आहेत. उभय संघातीन दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवारी (12 जुलै) सुरू झाली. पहिल्या सामन्यात विराट कोहली संयमी खेळी करताना दिसला असून त्याला पहिला चौकार मारण्यासाठी तब्बल 80 चेंडू वाट पाहावी लागली. डावातील पहिला चौकार मारल्यानंतर विराटची प्रतिक्रिया प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल यांनी चांगली सुरुवात दिली. सलामीसाठी आलेल्या या दोघांनी वैयक्तिक शतके केली. तिसऱ्या क्रमांकावरील शुबमन गिल मात्र अवघ्या 6 धावा करून बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहली (Virat Kohli) आक्रामक खेळी करे, असा काहींचा अदाजा होता. मात्र, विराटने कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक अशी संयमी खेळी करताना दिसला. डावातील पहिल्या 80 चेंडूत त्याला एकही चौकार मारता आली आहे. डावातील 81 व्या चेंडूवर विराटने चौकार मारल्यानंतर त्याला स्वतःलाही आनंद झाल्याचे पाहायला मिळाले.
https://twitter.com/FanCode/status/1679604437743173633?s=20
डावातील पहिला चौकार मारण्यासाठी विराटला यापूर्वी इतका वेळ बहुतेक कधीच लागला नसावा. अशात हा चौकार मारल्यानंतर विराटही आनंदात होता. त्याने चौकाराचा आनंद अगदी अर्धशतक किंवा शतकाप्रमाणे केल्याचे पाहायला मिळाले. ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या आपल्या सहकारी खेळाडूंकडे पाहून विराटने हात उंचावला होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले.
दसम्यान उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर दुसऱ्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 2 बाद 312 धावांपर्यंत नेली. कर्णधार रोहित शर्मा याने 221 चेंडूत 103 धावा केल्या आणि विकेट गमावली. यशस्वी यस्वाल आणि विराट कोहली दुसऱ्या दिवसाखेर अनुक्रमे 143* आणि 36* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. तत्पूर्वी पहिल्या डावात वेस्ट इंडीजने 150 धावा केल्या होत्या. भारतीय संघ दुसऱ्या दिवसाखेर 162 धावांनी आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या –
शाळकरी पोरांमध्ये सॅमसनने बनवला फॅनबेस! वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याआधी फोटो व्हायरल
फाफच्या सुपर किंग्सचा अमेरिकन लीगमध्ये धमाका, नाईट रायडर्सविरुद्ध 69 धावांनी मिळवला दणदणीत विजय