चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सोमवारी (१५ फेब्रुवारी) भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आर अश्विनने जबरदस्त शतकी खेळी केली. यानंतर त्याच्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अश्विनची अष्टपैलू कामगिरी –
दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून अश्विनने ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १४८ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १०६ धावा केल्या. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील ५ वे शतक आहे. तसेच त्याआधी त्याने याच सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे भारताला इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांत गुंडाळण्यात यश आले.
त्यामुळे अश्विन एकाच कसोटी सामन्यात शतक आणि एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी तीन वेळा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी पॉली उम्रीगर आणि विनू मंकड यांनी प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली होती. तर अश्विनने यापूर्वी २०११ आणि २०१६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध देखील अशी कामगिरी केली होती.
मीम्स व्हायरल –
आर अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीनंतर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. अनेक चाहत्यांनी मीम्समधून अश्विनचे कौतुक केले आहे. अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल एका चाहत्याने विराट आणि अश्विनचा फोटोवर ‘चाॅंद तारे फुल शबनम, तुम से अच्छा कौन हैं’ असे वाक्य लिहिलेले मीम शेअर केले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने ज्यांनी चेपॉकच्या खेळपट्टीवर टीका केली होती त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून ‘अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया हैं’ असे एक मीम शेअर केले आहे.
https://twitter.com/itsdipuk/status/1361259119726985218
https://twitter.com/Ssrfan478780364/status/1361221219626881024
This one becoming memorable now..
Congratulations ashwin anna 😊#Ashwin #INDvENG pic.twitter.com/dux5KT5GJS
— Ganesh Karekar (@imGkarekar) February 15, 2021
Appreciation for #ashwin 🔥
29th five-wicket haul for Ravi Ashwin in Test cricket and his tally to 391 wickets-second consecutive five-wicket haul at his home ground. World record alert-He became the first bowler to dismiss 200 left-handed batsmen- Test @ashwinravi99 #IndvsEng pic.twitter.com/BzKg3PEvpm— Arunima (@_your_honeybee_) February 14, 2021
#Ashwin with a 5-wicket haul & a mind-blowing century: #INDvsENG pic.twitter.com/a9ezugpXjv
— Ana de Armas stan (@abhithecomic) February 15, 2021
https://twitter.com/Ssrfan478780364/status/1361201733410590720
England team right now:#ashwin #INDvENG @thebharatarmy pic.twitter.com/ed1KZBFTb0
— gpt 5o (aronya ka parivar) (@Sammith130) February 14, 2021
#Ashwin @ashwinravi99 well deserved century and a five wicket haul at hometown😍😎❤️🔥 pic.twitter.com/q8pAVwi6kf
— Aravind B (@aravindkrish01) February 15, 2021
भारताचे सामन्यावर वर्चस्व –
या सामन्यात सोमवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९ षटकात ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्यांना अजून ४२९ धावांची गरज आहे.
तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव ८५.५ षटकात २८६ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारत पहिल्या डावातील १९५ धावांची आघाडीसह ४८१ धावांनी पुढे असल्याने भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे. या डावात भारताकडून आर अश्विनने शतकी खेळी केली. अश्विनशिवाय या डावात विराट कोहलीने ६२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीच आणि मोईन अलीेने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तर स्टोनने १ विकेट घेतली.
त्याआधी भारताने पहिल्या डावात रोहित शर्माच्या दीडशतकी (१६१) तसेच अजिंक्य रहाणे (६७) आणि रिषभ पंतच्या (५८*) अर्धशतकाच्या जोरावर ३२९ धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांवर रोखले होते. त्यामुळे भारताने पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी मिळवली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
भावा जिंकलंस रे जिंकलंस..! शतक झालं अश्विनचं पण सेलिब्रेशन केलं सिराजने
देव, धोनी, भज्जी… यांच्याही अगोदर आता अश्विनला ‘आठवा’, पठ्ठ्याने विक्रमच केलाय तसा