---Advertisement---

रवी शास्त्री यांच्याऐवजी द्रविडकडे द्यायला हवे का भारताचे प्रशिक्षकपद? माजी क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर

On: गुरूवार, जुलै 22, 2021 11:40 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेलेला आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताने केलेले प्रदर्शन पाहून भारताचे नियमित प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडला प्रशिक्षक बनवण्याची मागणी सध्या चाहत्यांकडून होत आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वी 2018 सालामध्ये द्रविडच्या प्रशिक्षकाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. द्रविड सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा (एनसीए) प्रमुख असून तो तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देतो.

एका क्रिकेट चाहत्याने माजी सलामीवीर आकाश चोप्राला भारताच्या प्रशिक्षकाबद्दल विचारले होते. आकाशने यावर उत्तर देत म्हटले आहे की, द्रविड सोडून जर इतर कोणी ही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला, तर रवी शास्त्री यांना ते हरवू शकत नाही.

आकाश चोप्राने त्याचे यूट्यूब चॅनेल ‘आकाशवाणी’ च्या माध्यमातून एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ‘मला वाटत नाही की, राहुल द्रविड आपले नाव प्रशिक्षकाच्या यादीत ठेवेल. जर राहुल द्रविडला वाटले की, आपण संघाचे प्रशिक्षक व्हायचे आहे, जर त्याची इच्छा असेल तर शास्त्री आणि द्रविड यांच्यात मोठी टक्कर होऊ शकते. पण जर द्रविडने आपले नाव ठेवले नाही तर जो कोणी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करेल, तो शास्त्रींपुढे उभे राहू शकणार नाही, असे मला वाटते. ‘

आकाश पुढे म्हणाला की , ‘मला असे वाटत नाही की त्यामध्ये सध्या तरी काही बदल होईल. मला वाटते की, रवी शास्त्रीच पुढे ही प्रशिक्षक म्हणून राहतील. कारण ही एक प्रक्रिया आहे, काही अर्ज येतील, काही रेकी असतील. पण खरं सांगायचे झाले तर मला आता कोणताही बदल होण्याची चिन्हे दिसत नाही. या टी20 विश्व चषकानंतर एका वर्षाच्या आत आणखी एक टी20 विश्वचषक होणार आहे आणि त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी 50 षटकांचा विश्वचषक होणार आहे. भारतीय संघ आताच जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. सध्या भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे, मग बदल कशासाठी?’

महत्वाचे म्हणजे भारतीय संघाने रवी शास्त्रीच्या प्रशिक्षकाखाली अजून एक ही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेली नाही. मात्र संघाने द्विपक्षीय मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘गोलंदाजी करताना तो लयीत दिसत नाही’, हार्दिकच्या तंदुरुस्तीवर माजी भारतीय क्रिकेटरने उपस्थितीत केले प्रश्न

उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाच्या तयारीसाठी ‘हे’ दोन संघ युएईत लवकर पोहचण्यास सज्ज

श्रीलंकेविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर ‘गुरु’ द्रविडसह कर्णधार, उपकर्णधाराची खास मेजवाणी, फोटो भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---