---Advertisement---

‘गोलंदाजी करताना तो लयीत दिसत नाही’, हार्दिकच्या तंदुरुस्तीवर माजी भारतीय क्रिकेटरने उपस्थितीत केले प्रश्न

On: गुरूवार, जुलै 22, 2021 11:26 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या गेल्या २ वर्षांपासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्याच्यावर २०१९ साली शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यामुळे, त्याला गोलंदाजी करताना त्रास होत आहे. तो गेल्या दोन वर्षात खूप कमी वेळा गोलंदाजी करताना दिसला आहे. सध्या हार्दिक श्रीलंका दौऱ्यावर गेला असून तो वनडे मालिकेत गोलंदाजी करताना दिसला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना त्याला त्रास झाल्याचे जाणवले, त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

आकाश चोप्रा म्हणाला की, तो मागील अनेक दिवसांपासून गोलंदाजीपासून दूर आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत काही षटके फेकली असतील, पण त्याला त्यावेळी तसे करणे असहाय्य झाले होते. परंतु, येथे त्याची गोलंदाजी पाहून तो गोलंदाजीसाठी तंदुरुस्त नसल्याचे दिसून येते.

क्रिकइन्फोसोबत आकाश चोप्राने बोलताना सांगितले की, ‘शस्त्रक्रिया झाल्यापासून हार्दिक पंड्याच्या एक गोलंदाज म्हणून तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित होत आहे. येथेही तो पूर्वीसारखा लयीमध्ये नव्हता.’

आकाश चोप्रा म्हणाला की, ‘येथे बरीच कारणे आहेत. एक तर तो मागील काही दिवसांपासून गोलंदाजीपासून दूर आहे. त्याने कसोटी क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे कारण त्याला जास्त गोलंदाजी करायची इच्छा नाही आणि आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केली नाही. याच्या व्यतिरिक्त श्रीलंकेत ऊन खूपच आहे. त्यामुळे हे देखील एक कारण असू शकतं. यामुळे तो गोलंदाजीच्या फॉर्ममध्ये अजिबात दिसून येत नाही.’

त्याच बरोबर चोप्रा पुढे म्हणाला की, ‘त्यांची तंदुरुस्ती हा मुद्दा असू शकतो. परंतु गोलंदाजी करताना त्याचे शरीर कसे वाटते याबद्दल केवळ तोच सांगू शकतो. हो, पण गोलंदाज म्हणून तो लयीमध्ये दिसत नाही आणि इतकेच नव्हे तर तो नो बॉलही टाकत आहे. जेव्हा आपण फॉर्मच्या बाहेर असाल तेव्हाच हे घडते.’

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवस मालिकेतील तिसरा आणि शेवटचा 23 जुलैला होणार आहे. या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करणार की नाही हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाच्या तयारीसाठी ‘हे’ दोन संघ युएईत लवकर पोहचण्यास सज्ज

श्रीलंकेविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर ‘गुरु’ द्रविडसह कर्णधार, उपकर्णधाराची खास मेजवाणी, फोटो भन्नाट व्हायरल

भारताच्या केवळ २० खेळाडूंना मिळाली ऑलिम्पिक उद्घाटनात सहभागी होण्याची परवानगी, हे असतील ध्वजवाहक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---