---Advertisement---

लिजेंड्स लीग क्रिकेटनंतर पुन्हा निवृत्त क्रिकेटर्स उतरणार मैदानात! ‘या’ ४ शहरांत होणार रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज

On: बुधवार, फेब्रुवारी 2, 2022 12:17 AM
sachin tendulkar road saftey world series
---Advertisement---

लवकरच आपल्याला निवृत्त खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.कारण रोड सेफ्टी वर्ल्ड (road safety world series) सिरीजचे दुसरे पर्व सुरु होणार आहे. या सामन्याच्या माध्यमातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर(sachin tendulkar) पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग व इतर अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या सिरीजचे पहिले पर्व सचिनच्या संघाने जिंकले होते. अशी माहिती समोर आली आहे की, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज फेब्रुवारीमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खेळवली जाऊ शकते. हे सामने हैद्राबाद, विशाखापट्टणम, लखनऊ आणि इंदोर या ४ शहरांत खेळवले जाणार आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका असल्यामुळे लखनऊमध्ये होणारे सामने १० मार्चनंतर खेळवले जाण्याची शक्यता आहे. तर बाकी ३ शहरांमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेचे आयोजक म्हणाले की, “सध्या ही स्पर्धा आम्ही फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सुरू करण्याचा विचार करत आहोत. आम्हाला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्पर्धा सुरू करायची आहे आणि अंतिम फेरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपेल.”

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या पहिल्या पर्वात भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या संघांनी सहभाग घेतला होता. या पर्वात दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. इंडिया लिजेंड्स या संघाचा कर्णधार सचिन तेंडूलकर होता आणि हा संघ विजयी झाला होता. सचिनसोबत या संघात इरफान पठान, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, यूसुफ पठाण यांचा सुद्धा सामावेश होता. ही स्पर्धा रायपूरमध्ये खेळली गेली होती. इंडिया लिजेंड्सने शेवटच्या सामन्यात श्रीलंका लीजेंड्सला १४ धावांनी मात देत विजय मिळवला होता.

अलीकडेच या स्पर्धेत सचिन खेळणार नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत, त्यामुळे तो या पर्वात सहभागी होईल की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेंडुलकर लीजेंड लीग क्रिकेटमध्येही दिसला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी-कोहलीवर नाही आली वेळ, पण रोहितला ‘या’ बड्या आव्हानाला जावं लागणार सामोरे

मेगा ऑक्शनला लागणार चार चाँद! चक्क पश्चिम बंगालच्या मंत्र्यानं नोंदवलंय नाव, असेल सर्वांची नजर

चेन्नईयन एफसी अव्वल चौघांत स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील, दुबळ्या ईस्ट बंगालचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---