---Advertisement---

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजमध्ये दिसली कोरोना सदृश्य लक्षणे, चाचणीचा अहवाल आला….

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 10:03 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिक नंतर नीरजचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरातून त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावही होत आहे. असे असले तरीही त्याच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्राला ताप आला आहे. त्याची कोरोना चाचणी झाली असून त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने एक ट्विट करत या बातमीची पुष्टी केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्राला खूप ताप आला आहे. असे असले तरीही त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.”

आयएएनएसच्या माहितीनुसार, नीरज चोप्राच्या संपर्कातील एका व्यक्तीने सागितले आहे की, “कालपर्यंत (१४ ऑगस्ट) त्याच्या शरीराचे तापमान १०३ होते. मात्र आता त्याच्यात तब्येतीत सुधारणा होत आहे. त्याचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला आहे. डाॅक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचा दिनक्रम व्यस्त होता आणि त्याच्यामुळेच तो आजारी पडला आहे.”

सूत्रांनी सांगितले की, “नीरज आज (१५ ऑगस्ट) सायंकाळच्या राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. तो थेट तेथेच येईल. बाकीचे सर्व खेळाडू यावेळी अशोक हाॅटेलमध्ये आहेत. नीरजला खूप ताप आहे. त्याला घशात त्रासही आहे आणि हा त्रास कमी होत नाहीये. सुदैवाने त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तो आता आराम करत आहे.” यावरून हेच दिसते की नीरजचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्यामुळे तो आजच्या राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

“नीरज चोप्राचे पदक सर्व दक्षिण आशियाई लोकांचे आहे”, माजी श्रीलंकन गोलंदाजाचे भाष्य

ग्रेट भेट! सचिन तेंडुलकरने ‘रौप्यपदक’ विजेत्या मीराबाई चानूशी साधला संपर्क; ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल

“सुवर्णपदक जिंकले त्या दिवसापासून ते पदक मी माझ्या खिशात घेऊन फिरत आहे” – नीरज चोप्रा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---