सिडनी।ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर गुरुवारपासून(७ जानेवारी) सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिलने पहिल्या डावात सलामीला फलंदाजी केली.
या दोघांनी ७० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी २७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉस हेजलवूडने रोहितला २६ धावांवर स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद करत मोडली. रोहितने या २६ धावा करण्यासाठी ७७ चेंडू खेळले. रोहित जवळपास ११ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करत होता. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची चर्चा होती.
रोहितने ३० चेंडू खेळले आणि काकांना काढावी लागली अर्धी मिशी
पण याबरोबरच एकीकडे रोहितच्या पुनरागमनाची जरी चर्चा असली तरी दुसरीकडे त्याच्यामुळे अर्धी मिशी कापावी लागलेल्या एका काकांची देखील चर्चा आहे.
त्याचं झालं असं की एका ट्विटरकर्त्याने सिडनी कसोटीआधी ट्विटरवर प्रश्न विचारला होता की ‘रोहित शर्माचा अंतिम अकरा मधे समावेश करण्यासाठी कोणाला डच्चू देण्यात यावा.?’ या प्रश्नावर @Ajay81592669 नावाच्या एका ट्विटरकर्त्याने ‘रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम पुरुष आहे. ब्राॅड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो,’ असे उत्तर दिले होते.
विशेष म्हणजे रोहितला मयंक अगरवालच्या जागेवर सिडनी कसोटीत स्थानही मिळाले आणि त्याने ३० च काय पण तब्बल ७७ चेंडू खेळून काढले. त्यामुळे @Ajay81592669 या ट्विटरकर्त्या काकांनी चक्क खरंच त्यांचा शब्द पाळला आणि अर्धी मिशी काढून सर्वांना आश्चर्यचकीत केले.
रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम् पुरुष आहे.
ब्राॅड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो.
— Ajay (@Ajay81592669) December 29, 2020
https://twitter.com/Ajay81592669/status/1347427598884773890
“क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान”
सध्या या काकांची अर्धी मिशी कापण्याच्या गोष्टीचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. एवढेच नाही तर त्यांना अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. यावर स्पष्टीकरण देणारे एक ट्विटही त्यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘बऱ्याच जणांनी मी अर्धी मिशी काढल्याबद्दल मला नावे ठेवली. पण मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान होता आणि आहे. तरी देखील मी सिडनी डोळ्यासमोर असताना पैज लावण्याची चूक केली. म्हणून खूप विचारांतीच मी अर्धश्मश्रूमुंडन केलंय.’
बऱ्याच जणांनी मी अर्धी मिशी काढल्याबद्दल मला नांवे ठेवली. पण मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान होता आणि आहे. तरी देखील मी सिडनी डोळ्यासमोर असताना पैज लावण्याची चूक केली. म्हणून खूप विचारांतीच मी अर्धश्मश्रूमुंडन केलंय.
— Ajay (@Ajay81592669) January 8, 2021
दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या ९६ धावा –
रोहित बाद झाल्यानंतर लगेचच काहीवेळात गिलही अर्धशतक करुन बाद झाला. गिलने ५० धावा केल्या. भारताने दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ९६ धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद खेळत आहेत. तसेच भारत अजून २४२ धावांनी पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शुबमन गिलने २१ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकासह रचला ‘हा’ खास रेकॉर्ड
“रिषभ पंतला आपल्या यष्टीरक्षणात सुधारणा करण्याची नितांत गरज”
कॅमरॉन ग्रीनने एकअंगी झुकत पकडला शुबमन गिलचा शानदार झेल, पाहा व्हिडिओ