---Advertisement---

रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी गायले विचित्र गाणं, म्हणाले ‘Bye Bye Rohit…

On: शनिवार, फेब्रुवारी 24, 2024 3:02 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या आहेत. तसेच जो रुट 122 धावा करून नाबाद राहिला असून भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच, भारताला पहिला धक्का चारच्या स्कोअरवर बसला आहे होता. जेम्स अँडरसनच्या चेंडूवर 2 धावा काढून कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला आहे. त्यानंतर स्टेडियममध्ये बसलेल्या इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना एक अनोखे गाणे गायले आहे. जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर त्या व्हिडिओमध्ये इंग्लंड संघाचे चाहते रोहितला बाय-बाय करताना ऐकू येत आहेत.

अशातच या व्हिडिओवर युजर्स आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यामध्ये एका यूजरने कमेंट करत म्हंटले आहे की, बाय बाय बेसबॉल असे लिहिले आहे. तर आणखी एका युजरने लिहिले की, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाचा असा निरोप आम्ही पाहिला होता. तसेच दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की त्याला लवकरच योग्य उत्तर मिळेल.

दरम्यान, रांची कसोटीत पहिल्या डावात इंग्लंड संघाने 353 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडकडून जो रूटने शानदार शतक झळकावले आहे. याबरोबरच पहिल्या डावात 122 धावा केल्यानंतर जो रूट नाबाद राहिला. याशिवाय भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि संघाला पहिला झटका कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने लवकरच बसला होता. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलने डावाची धुरा सांभाळली. पण गिललाही मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात 38 धावा करून शुभमन गिल बाद झाला आहे. त्यानंतर आता जायसवाल आणि सरफराज फंलदाजी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---