---Advertisement---

अवघ्या 44 धावा करताच रोहित घडवणार इतिहास! षटकाराच्या बाबतीतही भारतीय कर्णधार टॉपवर

Rohit Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मोठ्या काळानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. त्याला अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी संघात निवडले गेले आहे. कर्णधाराच्या रुपात रोहित या मालिकेत खेळणार असून त्याला मोठे विक्रम नावावर करण्याची संधी देखील मिळणार आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी मागच्या 14 महिन्यांपासून एकही टी-20 सामना खेळला नाहीये. आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव मिळाला होता. या सामन्यानंतर हे दोन्ही दिग्गज वनडे विश्वचषक 2023च्या तयारीला लागले. दरम्यानच्या काळात भारताने अनेक टी-20 मालिका खेळल्या, पण विराट आणि रोहित या मालिकांमध्ये खेळले नाहीत. रोहित मोठ्या काळापासून एकही टी-20 सामना खेळला नसला, तरी त्याच्या नावावर मोठा विक्रम आगामी सामन्यांमध्ये नोंदवला जाऊ शकतो.

रोहित कर्णधाराच्या रुपात भारतासाठी सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनू शकतो. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचे 200 षटकार देखील तो लवकरच पूर्ण करणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत रोहितने अवघ्या 44 धावा केल्या, तर भारतासाठी सर्वाधिक टी-20आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या हा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने कर्णधाराच्या रुपात खेळलेल्या 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1570 धावा केल्या आहेत. सध्या भारताचा कर्णधार असणाऱ्या रोहितने 51 सामन्यांमध्ये 1552 धावा केल्या आहेत. 1112 धावांसर यादीत तिसरा क्रमांक एमएस धोनी याचा आहे.

षटकारांच्या बाबतीत रोहित शर्मा लवकरच द्विशतक पूर्ण करणार आहे. यासाठी त्याला अजून 18 षटकारांची गरज आहे. अफगाणिस्तानविरुद्ध रोहितला ही कामगिरी करता येईल, असी खात्री देता येणार नाही. पण आगामी टी-20 विश्वचषकात रोहित नक्कीच हा टप्पा पार करेल. सध्या टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक षटकार रोहितच्याच नावावर आहेत. तो या फॉरमॅटमध्ये 200 षटकार करणारा पहिला फलंदाज बनू शकतो. (After scoring 44 runs, Rohit Sharma will set a big record in T20 international cricket)

महत्वाच्या बातम्या – 
पाकिस्तानला मिळालं नवं नेतृत्व! न्यूझीलंड दौऱ्यात ‘या’ खेळाडूच्या हातात संघाची धुरा 
मुंबई इंडियन्ससोबत रोहितने पूर्ण केला 13 वर्षांचा प्रवास, चढ-उताराने भरलेल्या कारकिर्दीवर टाका एक नजर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---