आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताने आपला संघ जाहीर केला. टीम इंडियाने 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली होती. या संघात अनेक नवीन चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला होता. यातील एका चेहऱ्याने टीम इंडियात प्रवेश करताच खळबळ उडवून दिली आहे. तो एक युवा वेगवान गोलंदाज आहे ज्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत आपले इरादे आधीच स्पष्ट केले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 18 सदस्यीय भारतीय संघात दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा पहिल्यांदाच सामील झाला. या गोलंदाजाने संघात सामील झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच चेंडूने कहर केला. आसामविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीकडून पहिल्याच दिवशी हर्षित राणाने चमकदार कामगिरी केली. हर्षित राणाने 15 षटकात 62 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे, वेगवान गोलंदाज हर्षितने पहिल्याच दिवशी शानदार गोलंदाजी करत प्रथमच कसोटी संघात आपल्या समावेशाचा आनंद साजरा केला.
रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमात हर्षित आपला पहिला सामना खेळत असून त्याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आसामने पहिल्या डावात 6 गडी गमावून 264 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा हर्षित राणाकडे असतील. जो आपल्या खात्यात जास्तीत जास्त विकेट घेण्याचे लक्ष्य ठेवेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
हेही वाचा-
कर्णधार रोहितच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, घरच्या मैदानावर कसोटी गमावण्यात धोनीलाही टाकले मागे
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
‘थाला’प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार धोनी