टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शिखर धवनने काल (शनिवार, 24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धवनच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्याला पुढील डावाची सुरुवात करण्यासाठी शुभेच्छांचा पूर आला आहे. आता धवनच्या निवृत्तीच्या एका दिवसानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये रोहित शर्माने त्याच्या सोबतचे काही फोटो देखील शेअर केला आहे.
कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म एक्सवर पोस्टमध्ये लिहले, रूम शेअर करण्यापासून ते मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंत. तू नेहमीच माझे काम दुसऱ्या टोकापासून सोपे केलेस. द अल्टिमेट जट्ट
From sharing rooms to sharing lifetime memories on the field. You always made my job easier from the other end. THE ULTIMATE JATT. @SDhawan25 pic.twitter.com/ROFwAHgpuo
— Rohit Sharma (@ImRo45) August 25, 2024
सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारतासठी शानदार कामगिरी केली आहे. या जोडीने भारताला अनेक सामने जिंकवण्यात मोलाच्या योगदान दिले आहे. या जोडीने टीम इंडियासाठी वनडे सामन्यात 117 सामने खेळल्या आहेत. ज्यामध्ये जोडीने 45.15 च्या सरासरीने 5193 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यांच्या बॅटमधून 18 शतके आणि 15 अर्धशतके निघाली.
निवृत्तीची घोषणा करताना, शिखर धवनने ‘एक्स’वर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने लिहिले, “मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय बंद करत असताना, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद! जय हिंद!”
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024
धवन व्हिडिओमध्ये म्हणतोय, ‘सर्वांना नमस्कार! आज मी अशा वळणावर उभा आहे जिथून जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. माझ्याकडे नेहमीच एकच गंतव्य होते, टीम इंडियासाठी खेळायचे आणि तेही घडले. ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. सर्वप्रथम माझे कुटुंब. माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी. मदन शर्मा जी ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेट शिकलो.
गब्बर पुढे म्हणाला, ‘मला एक संघ मिळाला ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे खेळलो, मला आणखी एक कुटुंब मिळालं. मला नाव मिळालं आणि तुम्हा सर्वांचं प्रेम मिळालं. पण ते म्हणतात की कथेत पुढे जाण्यासाठी पाने उलटणे आवश्यक आहे, म्हणून मी तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.
हेही वाचा-
शिखर धवनच्या निवृत्तीवर विराट कोहली भावूक, खास पोस्ट टाकून म्हणाला…
मनू भाकरनं घेतली टीम इंडियाच्या वर्ल्ड कप हिरोची भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! मेगा लिलावात या तीन फिनिशर्संना करणार ताफ्यात समावेश