जवळपास 150 कोटींचा महाकाय भारत देश, आणि क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की भारताच्या संघासाठी खेळायचं, पंरतु अनेकांचं स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे खेळाडू दुसऱ्या देशांकडून खेळण्याचा मार्गाचा अवलंब करतात.
भारतीय क्रिकेटर स्मित पटेल अमेरिकेला गेला असून तो आता तिथेच खेळताना दिसून येईल. त्यांनतर आता राजस्थान रॉयल्स संघाचा माजी गोलंदाज सिद्धार्थ त्रिवेदीदेखील भारत सोडून निघून जाऊन अमेरिकेत मायनर लीग क्रिकेटमध्ये सेंट लुईस अमेरिकन्स संघाचं प्रतिनिधित्व करायला तयार आहे. हा 38 वर्षीय वेगवान गोलंदाज गेल्या महिन्यापासून तिथेच आहे आणि अमेरिका क्रिकेट अकॅडमी आणि क्लब (ACAC) सोबत खेळाडू-प्रशिक्षक या दुहेरी भूमिकेत दिसून येईल.
रणजी चषकात त्रिवेदीने गुजरातचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु राष्ट्रीय संघात असलेल्या मर्यादित स्थान मर्यादेमुळे त्याने अमेरिका जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिवेदीने एका वर्तमानपत्राला सांगितले की, ‘आता मला इथे येऊन (सेंट लुईस) जवळजवळ एक महिना झाला आहे. मी एसीएसीच्या प्रशिक्षण मंडळाचा भाग आहे. त्यांच्या जवळ मायनर लीगमध्ये एक संघ (सेंट लुईस अमेरिकन) आहे. आणि त्यांनी मला विचारले की, मी एक खेळाडू म्हणून देखील संघाचा हिस्सा होऊ शकतो.’
सिद्धार्थ त्रिवेदीला आशा आहे की त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल
त्रिवेदीने गुजरातला एक मजबूत संघ बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. हा 38 वर्षीय खेळाडू दीर्घ काळापासून संधीच्या शोधात होता आणि 2019 साली अटलांटा प्रीमिअर लीगमधील दृश्य पाहून तो प्रभावित झाला.
त्रिवेदीने सांगितले, ‘मी पहिल्यांदा 2019 ला येथे आलो होतो तेव्हा मी अटलांटा प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला, तेव्हा मी जे दृश्य पाहिले आणि आता जे बघतोय ते निश्चितच या खेळासाठी (क्रिकेट) आनंददायक आहे. ज्या गोष्टीने मला सर्वाधिक प्रभावित केले ती गोष्ट म्हणजे, इथल्या इथल्या प्रतिकूल वातावरणात देखील जे काही 2-3 महिने मैदानावरील खेळांना अनुमती आहे, त्या कालावधीत लोक कठोर मेहनत आणि वेळेचा सदुपयोग या गोष्टी करताना दिसून येतात.’
महत्त्वाच्या बातम्या –
लईच भारी! साउथम्प्टनमध्ये दाखल झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने केली पार्टी, वॅग्नर बनला शेफ
भारत-न्यूझीलंड संघांच्या नियमांमध्ये भेदभाव? भारतीय संघ व्यवस्थापनाची आईसीसीकडे तक्रार