भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतबाबत धक्कादायक निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीप्रमाणेच रिषभ पंतलाही डॉक्टरांशी सल्लामसलत करण्यासाठी परदेशात पाठवण्यात येणार आहे. पंतला इंग्लंडला पाठवले जाईल आणि तो बरा झाला आहे की, नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला जाईल.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, जर रिषभ पंत (Rishabh Pant) अद्याप इंग्लंडला गेला नसेल तर तो येत्या काही दिवसांत जाऊ शकतो. तो लंडनला जाऊन उपचार घेऊ शकतो, जेणेकरून तो लवकरात लवकर मैदानात परतू शकेल. यापूर्वी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनाही उपचारासाठी लंडनला पाठवण्यात आले होते.
रिषभ पंतचे आयपीएलपर्यंत पुनरागमन अपेक्षित होते. पंत आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या वर्षी टी20 विश्वचषकही आयोजित केला जाणार आहे आणि रिषभ पंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून विश्वचषकासाठी आपला मजबूत दावा करू इच्छितो.
याआधी माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान याने रिषभ पंतबाबत मोठे वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, “रिषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त झाला तरी त्याच्यासाठी भारताच्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवणे खूप कठीण आहे. झहीर खानच्या मते, जरी पंतने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरी संघ व्यवस्थापन कदाचित त्याचा विचार करणार नाही.”
पुढे झहीर खान म्हणाला की, “रिषभ पंतला अनेक अडथळे पार करावे लागतील. प्रथम, त्याला परत येऊन खेळावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत हे सोपे नाही. त्याला सराव करून लय मिळवावी लागेल. या गोष्टींना वेळ लागू शकतो आणि म्हणूनच संघ व्यवस्थापन त्याच्या दिशेने पावले उचलू शकत नाही.” (After Suryakumar Yadav and Mohammed Shami, now BCCI has taken a big decision regarding Rishabh Pant)
हेही वाचा
PAK vs NZ: ‘कबड्डी-कबड्डी’, न्यूझीलंडविरुद्ध शाॅर्ट धाव घेतल्यामुळे धवनने रिझवानची उडवली खिल्ली
पाकिस्तानात पराभवाचे पडसाद, आधी प्रशिक्षकांचा राजीनामा, आता क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सोडले पद