रोहित शर्माच्या नेतृत्तवाखाली भारतीय क्रिकेट संघाने या वर्षीच्या टी20 विश्वचषकावर नाव कोरले होते. या यशानंतर कर्णधार रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर बीसीसीआयने स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाचे टी20 फाॅरमॅटचे कर्णधारपद सोपवले आहे. फुलटाईम कॅप्टन म्हणून सूर्याने यजमान श्रीलंकेविरुद्ध झालेली टी20 मालिका आपल्या नावे केली. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने लंकेचा 3-0 असा पराभव केला होता.
सूर्यकुमार यादवनंतर शुबमन गिलकडे भारतीय टी20 संघाचे कर्णधारपद मिळायला हवे. असे मत माजी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने व्यक्त केले. त्याने रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याला या शर्यतीतून बाहेर ठेवले. रैनाने युवा फलंदाज गिलचे केवळ कर्णधारपदासाठी आदर्श उमेदवार म्हणून वर्णन केले नाही. तर त्याला पुढील सुपरस्टार देखील म्हटले आहे. गिल सध्या भारताच्या वनडे आणि टी20 संघाचा उपकर्णधार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावरही त्यांनी भारताची धुरा सांभाळली आहे. गिल हा आयपीएलमधील गुजरात जायंट्सचा (जीटी) कर्णधार आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार रैना एका कार्यक्रमात म्हणाला, “शुबमन गिल एक सुपरस्टार आहे. गिल उपकर्णधार आहे. याचा अर्थ कोणीतरी त्यांच्याबद्दल विचार करत आहे. जर गिलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आणि ट्रॉफी जिंकली तर तो पुढील भारतीय संघाचा (कर्णधार) आहे. तसेच तो टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार असेल.” असे ही तो म्हणाला. तसेच रैनाने पंतच्या कसोटी संघात पुनरागमन केले. तो म्हणाला, “पंतने दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावले आहे. तो चांगली कामगिरी करत आहे”.
विकेटकीपर फलंदाज पंतने डिसेंबर 2022 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. त्यानंतर कार अपघातामुळे पंतला बराच काळ खेळापासून दूर राहावे लागले. 2024 च्या टी20 विश्वचषकातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. श्रीलंका दौऱ्यावर तो एकदिवसीय सामन्यात परतला. त्याचबरोबर पंत आता गुरुवारपासून कसोटी खेळताना दिसणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर होणार आहे.
हेही वाचा-
‘या’ 3 दिग्गजांच्या नावावर कसोटीमध्ये दोन्ही डावात शून्यावर बाद होण्याचा खराब रेकाॅर्ड
आयपीएलमधून लवकरच निवृत्त होणार का धोनी? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
“भारतावर भारी पडणार ऑस्ट्रेलिया…” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी