मागच्या वर्षी खराब फॉर्मशी झगडत असतानाही हार्दिक पंड्याला टी२० विश्वचषकात (t20 world cup 2021) खेळण्याची संधी दिली गेली होती. विश्वचषक स्पर्धेत त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते आणि यासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, त्याला एका फलंदाजाच्या रूपात सामील केले होते. पण नंतर अष्टपैलू भूमिकेची अपेक्षा केली गेली. अशात आता विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (rajkumar sharma) हार्दिकच्या या वक्तव्यानंतर भडकले आहेत.
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (hardik pandya) मागच्या जवळपास दोन वर्षांपासून खराब फॉर्मशी झगडत आहे. तरीही त्याला मागच्या वर्षी आयीसीसी टी२० विश्वचषक खेळण्याची संधी दिली गेली होती. टी२० विश्वचषकात हार्दिक फिटनेसच्या कारणास्तव गोलंदाजी करू शकला नव्हता. अशात विराटने लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा म्हणाले की, विश्वचषकासाठी निवडून हार्दिकवर निवडसमितीने दया दाखवली आहे. त्यांच्या मते, हार्दिकने अधिक ठोस कारण द्यायला पाहिजे होते. हार्दिकने दिलेल्या या मुलाखतीत त्याने विश्वचषक जिंकण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजकुमार शर्मा म्हणाले की, “कोणत्याही संघाची जेव्हा निवड केली जाते, तेव्हा त्या संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या काही मागण्या असतात. पण, अंतिम निर्णय निवडकर्ते घेतात. जर हार्दिकला संघ व्यवस्थापनाची साथ मिळाली होती, तर त्याने असे वक्तव्य करायला नको होते. त्याने निवडकर्त्यांचे आभार मानले पाहिजे होते की, संघात त्याच्यासाठी जागा तयार केली गेली. तो गोलंदाजी करू शकत नव्हता, तर त्याला एका फलंदाजाच्या रूपात निवडले गेले. जर तो निवडकर्त्यांविषयी असे वक्तव्य करत असेल, तर निवड समितीने त्याला उत्तर दिले पाहिजे.”
दरम्यान, मागच्या दोन आयपीएल हंगामातील हार्दिकचे खराब प्रदर्शन पाहून मुंबई इंडियन्सने मागच्या हंगामानंतर त्याला रिलीज केले. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी अहमदाबाद फ्रेंचायझीने त्याल संघात सामील केले आणि कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली. अशात हार्दिकच्या नेतृत्वातील अहमदाबाद संघ पुढच्या आयपीएल हंगामात काय कमाल करतो, ही गोष्ट पाहण्यासारखी असेल.
महत्वाच्या बातम्या –
विराटनंतर ‘असा’ असेल भारताचा नवीन कसोटी कर्णधार; बीसीसीआय अध्यक्षांशी दिली माहिती
अनिल कुंबळेंना का सोडावे लागले होते संघाचे मुख्य प्रशिक्षकपद? पाच वर्षानंतर झाला खुलासा
U19 WC FINAL| नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने; प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय