भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (18 नोव्हेंबर) चेतन शर्मा अध्यक्ष असलेली संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली. चेतन यांच्या कार्यकाळादरम्यान भारतीय पुरुष संघ 2021मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीतून बाहेर झाला. तसेच जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा, आशिया चषक 2022 या स्पर्धांमध्येही संघाच्या हाती निराशाच लागली. त्याचबरोबर चेतन यांच्या कार्यकाळात विराट कोहली याच्या नेतृत्वावरूनही वाद निर्माण झाले होते. आता त्या समितीमधील लोकांना काढण्यात आल्याने विराटच्या चाहत्यांनी हास्यस्पद ट्विट्सचा पाऊस पाडला आहे.
झाले असे की, 2021च्या टी20 विश्वचषकानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने भारताच्या टी20 प्रकारचे कर्णधारपद सोडले. कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार राहण्याची त्याची इच्छा होती, मात्र निवड समितीने मर्यादित षटकांच्या संघासाठी पूर्णवेळ नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे सोपवले आणि यामुळेच नाराज होत विराटने कसोटीचेही कर्णधारपद सोडले.
त्यानंतर बीसीसीआयचे तेव्हाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी खुलासा केला होता की त्यांनी विराटला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. चेतन यांनीही असेच म्हटले होते, परंतु विराटने त्याला नकार दर्शविला आणि सांगितले की त्याला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघाच्या निवड बैठकीच्या दीड तास आधी कळवण्यात आले होते. ही कसोटी मालिका झाल्यानंतर विराटने कसोटी कर्णधारपदाची भूमिकाही सोडली. आता त्यांनाचा बीसीसीआयकडून काढल्याने विराटच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.
जेव्हा चेतन आणि बाकी संघनिवड अधिकाऱ्यांना काढले गेले तेव्हा विराटच्या चाहत्यांनी खालीप्रकारे आनंद व्यक्त केला. त्यातील एक नेटकऱ्याने लिहिले, ‘गांगुलीची हकालपट्टी, चेतन शर्मा यांची हकालपट्टी, रोहितची टी-२० संघातून हकालपट्टी, मुंबई लॉबी सत्तेतून नेस्तनाबूत केली….बेंगलोर रक्त – रॉजर बिन्नी बीसीसीआय अध्यक्ष आणि कोहली फॉर्ममध्ये आहे’
18th November last year Chetan Sharma removed Virat Kohli from captaincy.
18th November this year, Chetan Sharma got sacked.
THIS IS KARMA AND CHETAN GOT SERVED. King still stands tall.#ViratKohli𓃵 pic.twitter.com/G4ObU8Yhuh
— Avinash (@imavinashvk) November 18, 2022
Roger Binny to Chetan Sharma while kicking him out.
"The King Sends his regards" pic.twitter.com/1wCHNV8Hle
— NSR (@Nandan_) November 18, 2022
Virat Kohli back in form and everything looks better from social media to news channels to now BCCI sacking undeserving ones like Saurav Ganguly and Chetan Sharma. Indian Cricket is healing.
— Pari (@BluntIndianGal) November 18, 2022
https://twitter.com/DigvijayRog/status/1593635287971680257?s=20&t=0nJ_LZw6Gb8KFd5FLnmJHA
चेतन जेव्हा निवड समितीचे अध्यक्ष होते तेव्हा जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसाबाबतही चुकीचे निर्णय घेण्यात आले. भारतीय पुरूष क्रिकेट संघ आता जानेवारी 2023पासून नव्या निवड समितीच्या नियंत्रणाखाली निवडला जाईल. या निवडकर्त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अर्जदारांच्या अटी बीसीसीआयने ट्विट करत स्पष्ट केल्या. After the BCCI dismissed the selection committee, Virat Kohli’s fans tweeted
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या नव्या निवडकर्त्यांच्या जबाबदाऱ्या घ्या जाणून, बीसीसीआयने जाहीर केली यादी
श्रीलंका क्रिकेटमध्ये सनथ जयसूर्या, वसीम अक्रम यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी