आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला पाच विकेट्स राखून पराभवाची धूळ चारली. सामन्यात सुरुवातीला अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानपुढे विजयासाठी १४८ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तनने हे लक्ष्य १९ षटकांमध्ये गाठले. सामन्यातील पराभवानंतर माध्यमांसोबत बोलताना अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी पत्रकारांवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.
अफागाणिस्तानला सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर कर्णधार मोहम्मद नबी पत्रकार परिषदेत पोहोचला. त्याला यावेळी एका पत्राकाराने असा प्रश्न विचाराला, ज्यामुळे नबी निराश झाल्याचे दिसले आणि अशाप्रकारचे प्रश्न न विचारण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेतील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, पत्रकार नबीला प्रश्न विचारतो की, अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार आल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध अधिक चांगले झाले आहेत का ? तसेच पत्रकार पुढे विचारतो की, यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटचा विकास होण्यामध्ये मदत होईल का ? पत्रकाराने विचारलेला हा प्रश्न नबीला आवडला नाही, पण त्याने स्वत्त:वर संयम ठेवला आणि या प्रश्नला कसलेही उत्तर दिले नाही.
पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नानंतर नबी म्हणाला की, “आपण अफगाणिस्तनमधील परिस्थितीला सोडून क्रिकेटविषयी बोलू शकतो का ? क्रिकेटविषयी बोलू शकलो, तर चांगले होईल. कारण, आम्ही येथे विश्वचषकासाठी आलो आहोत आणि पूर्ण तयारी करून आलो आहोत. जर तुमचा क्रिकेटशी संबंधित कोणता प्रश्न असेल तर विचारू शकता.”
नबीने पत्रकाराला एवढे सांगूनही पत्रकाराने त्याचा प्रश्न बदलला नाही आणि तोच प्रश्न पुन्हा विचारला. यानंतर नबी म्हणाला की, हा क्रिकेटशी संबंधित प्रश्न नाहीये. यानंतर नबी पत्रकार परिषद संपवतो आणि तेथून निघून जातो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला आहे आणि लोक या व्हिडिओला त्यांची पसंती दर्शवत आहेत.
https://twitter.com/ShirazHassan/status/1454162813543452680
अफगाणिस्तानने टी२० विश्वचषकात आत्तापर्यंत २ सामने खेळले असून एक सामना जिंकला आहे आणि एक सामना पराभूत झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भुवनेश्वर एक अनुभवी गोलंदाज, पण मला त्याच्याऐवजी शार्दुलला निवडेल”
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर
जेव्हा चेतन शर्माने घेतली होती हॅट्रिक; तेही तीन क्लीन बोल्ड!






