---Advertisement---

पराभव लागला जिव्हारी, रोहित शर्माने मुंबईच्याच ‘या’ खेळाडूंवर साधला निशाणा

Rohit Sharma
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या ३९ व्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत झाली. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्सने मुंबईला ५४ धावांनी पराभूत केले आहे. आरसीबीने मुंबई समोर जिंकण्यासाठी १६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण मुंबईचा पूर्ण संघ १८.१ षटकांत केवळ १११ धावांवर सर्वबाद झाला.

या विजयानंतर आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर मुंबई सातव्या स्थानावर घसरली आहे. सामना संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा निराश दिसला आणि त्याने संघाच्या फलंदाजांना या पराजयासाठी जबाबदर धरल्याचे दिसत आहे.

रोहित सामना संपल्यानंतर म्हणाला की, मला वाटते की आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. कारण एकेवेळी बेंगलोरची धावसंख्या १८० पेक्षा अधिक होईल असे वाटत होते. या सामन्यात आमच्या फलंदाजांनी निराशा केली आणि हे आमच्या सोबत मागच्या काही काळापासून होत आहे. फलंदाजांसोबत याविषयी बोलावं लागणार आहे, ज्यांना पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.

त्याने पुढे सांगितले की, विकेट पडल्यानंतर त्यांच्या संघाने प्रत्येक क्षणी दबाव कायम ठेवला. आम्ही सध्या ज्या स्थितीत आहोत येथून जोरदार वापसी करावी लागणार आहे. आम्ही मागच्या हंगामात हे केलेलं आहे. मात्र, या हंगामात आम्हाला हे करण्यामध्ये यश मिळत नाही.

रोहित ईशान किशनच्या खराब फार्मविषयीही बोलला आहे. तो म्हणाला, ईशान खूप प्रतिभाशाली फलंदाजी आहे. त्याचा आयपीएलचा मागचा हंगाम खूप कमाल राहिला होता. आम्हाला वाटते की त्याने त्याचा स्वाभाविक खेळ दाखवावा, ज्यासाठी आम्ही त्याला वरच्या फळीत सूर्यकुमार यादवच्या आधी पाठवत आहोत.

दरम्यान, सामन्यात आरसीबीचा हर्षल पटेलने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि एका हॅट्रिकसह एकूण चार विकेट्स मिळवल्या. आरसीबीने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहली आणि मॅक्सवेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने १६५ धावांचा टप्पा गाठला.

मुंबईसाठी सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि डी काॅकने चांगली सुरुवात करून दिली होती, पण त्यांच्या विकेट गमावल्यानंतर संघाचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. परिणामी मुंबईला सामन्यात ५४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हृदय जिंकलस! टीम इंडिया आधी आयपीएलमधील वैर नंतर; विराटची निराश झालेल्या इशान अन् रोहितशी भेट

हार्दिक, पोलार्डसारख्या दांडग्या फलंदाजांनाही बदडलं, हर्षलच्या हॅट्रिकचा व्हिडिओ बघून म्हणाल, ‘सरस छे’!

वडिलाचे हाल लेकाला बघवले नाहीत, डिव्हिलियर्सला बाद होताना पाहून मुलाचा संताप, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---