इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने जिंकली आहे. या विजयानंतर आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकवारीत भारतीय संघाचा फायदा झाला आहे. ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीनुसार रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाकिस्तानच्या पुढे तिसरा क्रमांक गाठला आहे. भारतीय संघाकडे सध्या १०९ रँकिंग गुण आहेत, तर पाकिस्तान मात्र १०६ रँकिंगसह चौथ्या क्रमांकावर आला आहे.
न्यूझीलंड संघा आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडकडे एकूण १२८ रँकिंग गुण आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला आणि शेवटचा सामन्यात अप्रतिम प्रदर्शन करून जिंकला. एकदिवसीय मलिका भारताने १-२ अशा अंतराने जिंकली असली, तरी क्रमवारीत मात्र इंग्लंड भारतापेक्षा पुढे आहे. इंग्लंडचा संघ १२१ रँकिंगसह क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडप्रमाणेच भारतानेही सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्या होत्या. एकवेळी असे वाटू लागले होते की, इंग्लंडने दिलेले हे २६० धावांचे लक्ष्य भारत गाठू शकणार नाही. परंतु नंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे संघाने ४२.१ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. पंतने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावा ठोकल्या. तर हार्दिकने फलंदाजीत ७१ धावा आणि गोलंदाजीत २४ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
भारताला या आठवड्यात एकदिवसीय क्रमवारीत फायदा झाला असला, तरी पुढच्या आठवड्यात क्रमवारीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. कारण सहाव्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तानपेक्षा फक्त ७ रँकिंगने मागे आहे. आफ्रिकी संघाने जर आगामी एकदिवसीय मलिकेत इंग्लंडला क्लीन स्वीप (३-०) दिला, तर ते पाकिस्तानी संघाला मागे टाकून चौथा क्रमांक काबीज करू शकतात.
दुसरीकडे शुक्रवार (२२ जुलै) पासून भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. पाकिस्तान संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यांना पुढची एकदिवसीय मालिका ऑगस्ट महिन्यात नेदरलँडविरुद्ध खेळायची आहे. याच कारणास्तव ऑगस्ट महिन्यातही एकदिवसीय क्रमवारीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वनडेतून निवृत्ती घेतलेल्या बेन स्टोक्सची संपत्ती आहे तरी किती?
तिसऱ्या वनडेपूर्वी पंतला मिळालेला खास सल्ला, भारताचा माजी दिग्गजाचे ट्वीट व्हायरल