---Advertisement---

आयपीएलमध्ये स्मिथ, स्टोक्सबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्याबद्दल जयस्वालने केले मोठे भाष्य; म्हणाला

On: मंगळवार, फेब्रुवारी 18, 2020 4:32 PM
---Advertisement---

नुकताच 19 वर्षाखालील विश्वचषक (Under 19 World Cup) दक्षिण आफ्रिकेत पार पडला. या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाला बांगलादेश विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

असे असले तरी मात्र भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.  या विश्वचषकातील अवघ्या 6 सामन्यात यशस्वीने 400 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले आहे.

आता यशस्वी आयपीएलमध्येही पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. त्याला आयपीएल 2020 च्या मोसमासाठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्यामुळे यशस्वी आयपीएलमध्ये स्टिव्ह स्मिथ कर्णधार असलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

आयपीएल दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉस बटलर (Jos Buttler) या अनुभवी खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणे ही एक चांगली संधी असल्याचे यशस्वीने इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

“माझ्यासाठी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळण्याची खूप चांगली संधी आहे. कारण मी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू जसे की, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांच्याशी चर्चा करणार आहे,” असे खेळाडूंबद्दल बोलताना यशस्वी म्हणाला.

“त्यांच्याकडून शिकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझा पहिला आयपीएल मोसम असल्याने माझ्यासाठी रोमांचक ठरणार आहे. तसेच मला जे काही शक्य होईल ते करण्याचा मी प्रयत्न करेन,” असेही यशस्वी यावेळी म्हणाला.

19 वर्षाखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध 105 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामध्ये 4 षटके आणि 8 चौकारांचा समावेश होता. त्याचबरोबर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 88 धावांची खेळी केली होती.

https://twitter.com/Maha_Sports/status/1229416952906604545

https://twitter.com/Maha_Sports/status/1229415478411628545

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---