योगायोग आला जुळून! विराटसोबत आता ‘हा’ खेळाडूही बनणार पहिल्यांदा ‘बाबा’, घेणार पालकत्व रजा

After Virat Kohli Kane Williamson Could Take Paternity Leave From Cricket

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांच्याबाबत एक खास योगायोग जुळून आला आहे. म्हणजेच विराट आणि विलियम्सन हे पहिल्यांदा वडील बनणार आहेत. त्यामुळे त्यांनी आपापल्या क्रिकेट बोर्डाकडून पालकत्व रजा घेतली आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशात परतणार आहे. जानेवारीमध्ये त्याची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील खास क्षण विराटला पत्नीसोबत घालवायचा आहे.

विराटप्रमाणेच विलियम्सनही पहिल्यांदाच वडील बनणार असल्यामुळे तो डिसेंबरच्या शेवटी पालकत्व रजा घेऊन पत्नीसोबत वेळ घालवणार आहे. न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी याबाबत कोणतीही चिंता नसल्याचे म्हटले आहे.

स्टेड म्हणाले की, जीवनात अनेक गोष्टींना क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्व असते. ईएसपीएन क्रिकइंफोने स्टेड यांच्या माहितीवरून सांगितले की, “विलियम्सन काही सामन्यात नसेल. एक वडील म्हणून, आई-वडील म्हणून, तुम्हाला आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी तिथे राहण्याची संधी जीवनात केवळ एकदा मिळते. मला माहिती आहे की, हे विलियम्सनसाठी खूप महत्त्वाचे आहे.”

सध्या न्यूझीलंड संघ वेस्ट इंडिज संघाचे यजमानपद सांभाळत आहे. न्यूझीलंडने हॅमिल्टनमध्ये वेस्ट इंडिजला एक डाव आणि १२४ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

यानंतर न्यूझीलंड संघ पाकिस्तान संघाचे यजमानपद सांभाळणार आहे. ही मालिका १८ डिसेंबरपासून सुरू होईल. पाकिस्तान संघ आधीच न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे.

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.