आशिया चषक 2022 मध्ये रविवारी (4 सप्टेंबर) पाकिस्तानने भारताला पराभूत केले. भारतासाठी विराट कोहलीने अर्धशतक केले, पण तो संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने या सामन्यात फलंदाजी क्रमात एक महत्वाचा बदल केला, जो फायदेशीर देखील ठरला. सामना जिंकल्यानंतर बाबरने मोहम्मद नवाजला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचे कारण स्पष्ट केले.
भारत आणि पाकिस्तान संघ सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात आमने सामने आले होते आणि पाकिस्तानने हा सामना पाच विकेट्सने जिंकला. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि मोहम्मद नवाज (Mohammed Nawaz) यांच्यात चौथ्या विकेटसाठी 41 चेंडूत 73 धावांची भागीदारी पार पाडली. मोहम्मद नवाज नेहमी पाकिस्तानसाठी आठव्या क्रमांकावऱ खेळत असतो, परंतु कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने त्याला या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळवले. संघाने दाखवलेल्या या विश्वासावर नवाज देखील खरा उतरला.
सामना जिंकल्यानंतर कर्णधार बाबर म्हणाला की, “आमचा प्रयत्न या गोष्टी सोप्या ठेवण्याचा होता. खेळताना चढ उतार येत असतात. त्यांनी ज्या पद्धतीने पावरप्लेचा वापर करून घेतला, त्यामुळेच आमच्या गोलंदाजांना पुनरागमन केले. नवाज आणि रिजवान यांची भागीदारी, या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. मला वाटले लेग स्पिनर्सविरुद्ध नवाज महत्वाची भूमिका पार पाडेल.”
मोहम्मद रिजवानने 51 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. तसेच नवाजने अवघ्या 20 धावांमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांमध्ये 42 धावा केल्या. नवाजने वादळी खेळी केल्यामुळे पाकिस्तान संघावरचा दबाव कमी झाला होता. सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला. अर्शदीपने टाकलेल्या शेवटच्या षटकात पाकिस्तानला 7 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर इफ्तिकार अहमदने 2 धावा घेऊन पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 181 धावा केल्या होत्या. विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने 44 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 60 धावा केल्या. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी प्रत्येक 28-28 धावांची खेळी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बाबर आझमवर डोके धरायची वेळ! भारताविरुद्धच्या विजयाचा नायक सामन्यानंतर थेट रुग्णालयात
‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’
नेहमी भारतीय संघावर निशाणा साधणारा पाकिस्तानी क्रिकेटर उतरला अर्शदीपच्या समर्थनार्थ, म्हणतोय..