---Advertisement---

‘तो खूप कठीण…’, रिषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल बोलताना रोहित शर्मा भावूक

---Advertisement---

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या बांग्लादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात रिषभ पंतने शतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर रिषभ पंतचा हा पहिलाच कसोटी सामना होता. या फॉरमॅटमध्ये भारतीय संघ आणि चाहते त्याला खूप मिस करत होते. बांग्लादेशविरुद्ध रिषभ पंतचे हे पुनरागमन पाहून रोहित शर्माही भावूक झाला. टीम इंडियाने बांगिलादेशला पहिली टेस्ट जिंकण्यासाठी 515 धावाचं टार्गेट दिलं होतं, ज्यासमोर पाहुण्या टीम 234 धावांवर गडगडली. भारताने हा सामना 280 धावांनी जिंकला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे.

रोहित शर्मा सामन्यानंतर रिषभ पंतबद्दल म्हणाला, “तो खूप कठीण काळातून गेला आहे. त्याने स्वतःला ज्या पद्धतीने हाताळले आहे ते पाहण्यासारखे आहे. प्रथमच तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला, त्यानंतर टी20 विश्वचषकाच्या यशामध्ये देखील तो अप्रतिम होता. त्याचे कसोटी हे सर्वात जास्त आवडीचे स्वरूप आहे. त्याचे पुनरागमनाचे श्रेय त्यालाच जाते. ज्या स्थितीतून त्याने कमबॅक केले. ते अद्भूत होते. तो या फाॅरमॅटमध्ये खेळताना फलंदाजीत नाही कर यष्टीमध्ये नेहमीच प्रभाव पाडतो”. 

बांग्लादेशविरुद्धच्या विजयाबद्दल रोहित म्हणाला, “आमच्यासाठी पुढे काय ध्येय धोरण आहे. याचा विचार करता हा एक चांगला निकाल होता. आम्ही खूप दिवसांनी खेळत आहोत. पण तुम्ही क्रिकेटमधून कधीच बाहेर नव्हतो. आम्ही एका आठवड्यापूर्वी इथे आलो होतो आम्हाला हवा होता तो निकाल मिळाला”.

चेन्नईच्या घरच्या मैदानावर शतक झळकावण्यासोबतच अश्विनने 5 विकेट्सही घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अश्विनबद्दल रोहित म्हणाला- “तो नेहमी बॉल आणि बॅटने आमच्यासाठी उपल्बध असतो. जेव्हाही आपल्याला त्याकडून अपेक्षा असते, तो नेहमीच पूर्ण करतो. तो कधीही खेळाच्या बाहेर नसतो. “त्याला तामिळनाडू प्रिमियर लीगमध्ये (TNPL) मध्ये फलंदाजी करताना खूप मजा आली.”

हेही वाचा-

‘हिटमॅन’नं सचिनला मागे टाकलं! जागतिक क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
चेन्नई कसोटीच्या दिमाखदार विजयानंतर दुसऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा: पाहा बदल
WTC: गुणतालिकेत टीम इंडियाला बंपर फायदा, बांग्लादेशला 440 व्होल्टचा धक्का!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---