इंडियन प्रीमियर लीग 2020 चा अंतिम सामना मंगळवारी ( 10 नोव्हेंबर ) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने विजय मिळवत आयपीएल कारकिर्दीतील 5 वा किताब पटकावला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सची संघमालक नीता अंबानी कर्णधार रोहित शर्मासमवेत आनंद साजरा करताना दिसली. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सन 2013 मध्ये मुंबई संघ प्रथमच आयपीएल चॅम्पियन बनला. यानंतर या संघाने 2015, 2017 आणि 2019 मध्येही जेतेपद जिंकले. 13 व्या हंगामात किताब जिंकून प्रथमच आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी केवळ चेन्नई सुपरकिंग्ज (2010 आणि 2011) या संघाला ही कामगिरी करण्यात यश आले होते. मुंबई दोन वेळा चॅम्पियन्स लीगचा विजेताही ठरला आहे. दिल्ली संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली आणि आयपीएल कारकिर्दीतील हे दिल्लीचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होते.
मुंबईने सामना जिंकल्यानंतर संघाची मालक नीता अंबानी मैदानात येऊन खेळाडूसमवेत आनंद साजरा करण्यात सामील झाल्या. निता अंबानी प्रथम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माकडे आली आणि विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी त्याला दोन्ही हाताने टाळी दिली ज्याला हायफायदेखील म्हणतात. नीता अंबानी आणि रोहित शर्माच्या या फोटोची चांगलीच चर्चा होतेयं.
नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली संघ 20 षटकांत 7 बाद 156 धावा करू शकला.प्रत्युत्तरादाखल मुंबईने 18.4 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 157 धावा केल्या. रोहितने 51 चेंडूत 68 धावा फटकावल्या ज्यामध्ये पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.युवा फलंदाज ईशान किशनने 19 चेंडूत नाबाद 33 धावा करत पुन्हा एकदा प्रभावीत केले.
Exclusive from #MILive: A virtual tour of the Dubai International Stadium and our #MI Dressing Room ➡️🏆🖐🏼💙 #OneFamily #MumbaiIndians #Dream11IPLFinal #MIvDC #MIChampion5 pic.twitter.com/PGX7DOPnyy
— Mumbai Indians (@mipaltan) November 10, 2020
Winning 5 trophies as a captain isn't everyone's cup of tea 🍵.
It's unfortunate for us that #RohitSharma isn't the captain of national team. #IPLfinal#Hitman pic.twitter.com/RX1dxZs242— 𝒫𝓇𝒾𝓃𝒸ℯ ℛ𝒶𝒿 (@Princeraj2494) November 10, 2020
https://twitter.com/ameyp9/status/1326219673986232321?s=20
5taying here 🏆💙pic.twitter.com/ZBhj1w34pH
— Mumbai Indians (@mipaltan) November 10, 2020
मुंबईने यंदाच्या मोसमात चौथ्यांदा दिल्लीवर सहज विजय मिळवला. या सामन्यात मुंबईने गोलंदाजीनंतर आक्रमक फलंदाजीलाही सुरुवात केली. रोहितने फिरकीपटू आर अश्विनच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला, तर दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे पहिले षटकही महागडे ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
संपुर्ण यादी- आयपीएल २०२०मध्ये या खेळाडूंना मिळाले अवॉर्ड्स!
बिहार निवडणूक : मुख्यमंत्री पदाच्या विजयी उमेदवाराने आजच्याच दिवशी केले होते धोनीच्या संघात पदार्पण
रोहितमुळे सूर्यकुमारच्या आयपीएलचा शेवट खराब? ‘त्या’ एका चुकीमुळे विनाकारण गमावली विकेट