---Advertisement---

वय हा केवळ आकडा! ५८ वर्षांची महिला क्रिकेट खेळताना मारतेय मोठे फटके, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

---Advertisement---

क्रिकेट हा खेळ भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. हा खेळ पाहाताना, खेळताना लोक इतके मग्न होतात की लोकांना त्यांच्या वयाचं देखील भान राहत नाही. कधीकधी लहान मुलं महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची नक्कल करताना दिसतात, तर कधी कधी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. आपल्याला बर्‍याचदा वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे क्रिकेट प्रेम भारतात पाहायला मिळते. अनेकदा विविध व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जातात.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोलकाता नाइट रायडर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला कॅप्शन असे लिहिले की, ‘या ५८ वर्षाच्या कोलकातामधील या आईच्या या शॉटला गुण द्या.’

या व्हिडिओमध्ये असे स्पष्ट दिसून येत आहे की, आजूबाजूला उभे असलेले लोक बंगाली भाषेत काहीतरी बोलताना दिसून येत आहे. पहिल्याच चेंडूवर ती महिला बचाव करताना दिसली, तर दुसऱ्या चेंडूवर ती पुढे येते आणि चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरून मारत जोरदार चौकार लगावते.

कोलकाता येथील या महिलेच्या या शॉटला लोकांनी खूपच पसंती दाखवली आहे. त्याचे पोस्ट पाहून लोक त्याचे खूप कौतुक करताना दिसून येत आहेत. त्याच बरोबर या व्हिडिओला अनेक लोकांनी कमेंट देखील केले आहेत. एका व्यक्तीने कमेंट केली की, ‘वय हा फक्त एक आकडा आहे.’

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, लोक त्यावर विविध प्रतिक्रिया देताना, क्रिकेट खेळणाऱ्या महिलेचे कौतुक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडमध्ये क्रिकेटपटू ट्रेनिंगमध्ये व्सस्त, तर पत्नीं आपल्या लाडक्या लेकींसह घेतायेत फिरण्याची मजा, फोटो भन्नाट व्हायरल

मैदानात घुसला चाहता, त्यानंतर बेन स्टोक्सनेही केली ती चूक; सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

दु:खद! १००० हून अधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन, क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---