---Advertisement---

दु:खद! १००० हून अधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन, क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त

On: बुधवार, जुलै 28, 2021 11:51 PM
---Advertisement---

इंग्लंड संघाचे माजी क्रिकेटपटू माइक हेंड्रिक्स यांचे मंगळवारी, २७ जुलै रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. हेंड्रिक्स याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांना मागील काही दिवसांपासून आतडे आणि यकृतचा कर्करोग झाला होता. हेंड्रिक्स यांची काऊन्टी क्रिकेटमध्ये खूप मोठी कारकीर्द होती. त्याच बरोबर त्यांनी डर्बीशायर आणि नॉटिंगहॅमशायर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेटविश्वातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

इंग्लंडचे माजी गोलंदाज हेंड्रिक्स आपल्या क्लासिकल साइड ऑन एक्शनसाठी प्रसिद्ध होते. इंग्लंड संघासाठी त्यांनी एकूण ३० कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात एकूण ८७ बळी घेतले आहेत. २५.८३ च्या सरासरीने त्यांनी विकेट घेतले आहेत. हेंड्रिक्स इंग्लंडकडून २२ एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत आणि एकूण ३५ बळी घेतले आहेत.

https://twitter.com/ICC/status/1420272665214869506

हेंड्रिक्स यांची कारकीर्द

हेंड्रिक्स यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९६९ साली काउंटी संघ डर्बशायरमधून केली होती. १९७४ सालामध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे त्याने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी साल १९७७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत ऍशेस ट्रॉफी जिंकली. त्यानंतर १९७७ मध्ये यांनी ९५ धावा देत ८ विकेट्स घेतल्या. १९७९ च्या विश्वचषकात इंग्लंडच्या संघातील हेंड्रिक्स हे एक महत्त्वाचे खेळाडू होते. या सामन्यात संघाने अंतिम फेरी देखील गाठली होती.

बारा वर्षाच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीमध्ये हेंड्रिक्स यांनी ७७० बळी, तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २९७ बळी घेतले आहेत. तसेच त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी १००० हून अधिक विकेट्स घेतल्या. १९८१ मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकण्यासाठी यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी क्लबच्या व्यवस्थापकपद देखील सांभाळले आहे. परंतु त्या अगोदर नॉटिंगघमशायरकडून खेळले होते. हेंड्रिक्स हे आयर्लंड संघाचे प्रशिक्षकही होते, त्यांनी ५ वर्षे हा पदभार सांभाळला होता. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्याचे कौतुक केले गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मास्टर ब्लास्टर’च्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

विराट अडकला वादाच्या भोवर्‍यात! ‘या’ कारणासाठी लवकरच मिळणार रीतसर नोटीस

आनंदाचा क्षण! भारताकडून पदार्पण करणाऱ्या ४ खेळाडूंना मिळाली ‘या’ वरिष्ठांकडून कॅप, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---