---Advertisement---

विराट अडकला वादाच्या भोवर्‍यात! ‘या’ कारणासाठी लवकरच मिळणार रीतसर नोटीस

On: बुधवार, जुलै 28, 2021 10:24 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तो ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. मात्र, इंग्लंडमध्ये असला तरी विराट आता एका नव्या वादात सापडला असून, त्याला रीतसर नोटीस बजावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या विराटने नुकतीच एक प्रायोजित सोशल मीडिया पोस्ट केली होती. ज्यामध्ये तो लव्हली प्रोफेशनली युनिव्हर्सिटीचा (एलपीयू) प्रचार केला होता. ही पोस्ट ऑलिम्पिक खेळांविषयी होती. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली तसेच, काही नाही त्याचे समर्थनदेखील केले. विराटच्या या पोस्टनंतर ॲडव्हर्टायझिंग स्टॅंडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाने (ASCI) त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

एएससीआयच्या नव्या नियमावलीनुसार, पोस्टमध्ये कोणतेही प्रकटीकरण नव्हते, जे असायला हवे होते. एएससीआयचे सेक्रेटरी जनरल म्हणाले, “आम्ही विराट कोहली व प्रायोजक लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांना नोटिस पाठवणार आहोत. विराटला आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी स्पष्टीकरण द्यावे लागेल.”

अशी होती सोशल मीडिया पोस्ट
विराटने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय दलातील १०% खेळाडू हे लव्हली प्रोफेशनली युनिव्हर्सिटीचे आहेत. मी आशा करतो की, ते भारतीय संघासाठीदेखिल खेळाडू पाठवतील. जय हिंद’

यासह विराटने या पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिले होते की, भारताला १० एलपीयूची गरज आहे. एलपीयूच्या ११ खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा. ही खुप मोठी कामगीरी आहे.’

Photo Courtesy: Instagram/@virat.kohli

भारत खेळणार इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथे खेळला जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील अपयश विसरून भारतीय संघ ही मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. स्वतः विराटला आपल्या मागील इंग्लंड दौऱ्यासारखी कामगिरी करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आनंदाचा क्षण! भारताकडून पदार्पण करणाऱ्या ४ खेळाडूंना मिळाली ‘या’ वरिष्ठांकडून कॅप, पाहा व्हिडिओ

नव्या टी२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंना मोठा फायदा, तब्बल दहा स्थानांची उडी घेत चहल पोहोचला ‘या’ क्रमांकावर

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने ‘या’बाबतीत मोडले सारे विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---