दक्षिण आफ्रिकेचा माझी दिग्गज गोलंदाज इमरान ताहीरने टी-20 फॉरमॅटमध्ये मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. तसेच इमरान ताहीरने टी-20 फॉरमॅटमध्ये 500 गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. या कामगिरीमुळे तो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आला आहे. याबरोबरच, इमरान ताहीरने 20 कसोटी सामने, 107 वनडे आणि 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
यासह त्याने आयपीएल स्पर्धेत 59 सामने खेळले आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे. इमरान ताहीरने आयपीएलमध्ये 51 सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 20.77 च्या सरासरीने आणि 7.76 च्या इकोनॉमिने 82 गडी बाद केले आहेत. तसेच 12 धावा खर्च करत 4 गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
याबरोबरच, इम्रान ताहिर 500 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज बांग्लादेश प्रीमियर लीग (BPL) 2024 मध्ये रंगपूर रायडर्सकडून खेळत आहे. मंगळवारी चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खुलना टायगर्सविरुद्ध खेळताना त्याने हा पराक्रम केला आहे. याआधी वेस्ट इंडिजचा गोलंदाज ड्वेन ब्राव्हो, सुनील नरेन आणि अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खान यांनी टी-20 क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेतले आहेत. तसेच इम्रान ताहिरने आपल्या 404व्या सामन्यात 500 बळींचा टप्पा पूर्ण केला आहे.
दरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळीच्या यादीत इम्रान ताहिरच नाव सध्या जोडलं गेलं आहे. तसेच ड्वेन ब्रावोच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक ६२४ गडी बाद केले आहेत. तर राशिद खानने ५५६ गडी बाद केले आहेत. सुनील नरेनने ५३२ गडी बाद केले आहेत. तर इमरान ताहीरच्या नावे ५०० गडी बाद करण्याची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या –






