भारतीय दिग्गज विराट कोहली मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. असे असले तरी, आगामी आयपीएल हंगामात विराटला अजून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. विराट जर स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे खेळू शकला तर आरसीबीसाठी यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही. याच पार्श्वभूमीवर विराटने खास प्रतिक्रिया दिली आहे.
आरसीबीसोबत बोलताना विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या फॉर्मविषयी मत व्यक्त केले. विराट म्हणाला की, “हे क्रिकेटविषयी आपले प्रेम पुन्हा शोधण्यासारखे होते. मी मैदानातून काही काळ लांब राहिल्यानंतर हे शक्य झाले. जेव्हा मी थकलो होतो, तेव्हा रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात होतो. मला सर्वात आधी स्वतःशी कनेक्ट व्हायचे होते. मला नियमितपणे स्वतःला शोधायचे होते आणि स्वतःची परिक्षा घ्यायची होती. काही काळ खेळ बंद केल्यानंतर हे सर्व करू शकलो.”
विराट आपल्या प्रदर्शनाविषयी पुढे म्हणाला, “मैदानातून मी जेव्हा पुनरागमन केले, तेव्हा सर्वकाही माझ्यासाठी नवीन संधीप्रमाणे होते. कसलाही दबाव नव्हता, ज्याचा परिणाम चांगला झाला. नुकतेच मी टी-20 आंतरराष्ट्रीय, वनडे आणि कसोटीत चांगले प्रदर्शन करू शकलो. आता मी पहिल्यासारखा खेळत आहे. पण अजून सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी खूप काही करायचे आहे. आशा आहे की, सध्या मी ज्या पद्धतीने खेळत आहे, तसे आयपीएलमध्ये खेलू शकलो, तर संघासाठी हे खूप मदतीचे ठरेल.”
दरम्यान, विराट कोहली आयपीएळ 2022 मध्ये आरसीबीसाठी काही खास कामगिरी करू शकला नव्हता. मागच्या हंगामातील 16 सामन्यांमध्ये विराट कोहली 22.73 च्या सरासरीने 294 धावा करू शकला होता. यातमध्ये त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश होता. असे असले तरी मागच्या 6 महिन्यांतील त्याचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकले, तीन वर्षांचा शतकाचा दुष्काळ संपवला. आयपीएल 2023 देखील विराटसाठी चांगले राहिल, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
(Ahead of IPL 2023, Virat Kohli gave a special reaction to his performance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिलं प्रेम सोडून ‘तिने’ धरला क्रिकेटचा हात, WPL स्पर्धेत गुगलीने दिग्गज खेळाडूंना देतेय त्रास
आयपीएल सुरू होण्याआधीच दिल्लीला जाणवली पंतची कमी! पाँटिंग मोठ्या निर्णयाच्या तयारीत