विराट कोहली याने अहमदाबाद कसोटीत कारकिर्दीतील 75 वे शतक ठोकले. अवघ्या 14 धावा कमी पडल्यामुळे विराटला द्विशतक करता आले नाही. असे असले तरी त्याने केलेल्या वादळी फलंदाजीसाठी सोशल मीडियावर सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याची पत्नी अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर स्टोरी शेअर करत विराटचे कौतुक केले. अनुष्काच्या स्टोरीमुळे विराट आजारी असल्याची माहितीही चाहत्यांपर्यंत पोहोचली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यतील बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा हा शेवटचा सामना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाला. परिणामी ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारताने देखील याठिकाणी मोठी धावसंख्या उभी केली. पहिल्या डावात दोन्ही सांघांच्या मिळून एकूण चार फलंदाजांनी शतके ठोकली. त्यात सर्वात मोठी खेळी विराट कोहली (Virat Kohli) याचीच होती. विराटने 364 चेंडूंचा सामना करत 186 धावा केल्या. भारताचा माजी कर्णधार 8 तास खेळपट्टीवर होता आणि 15 चौकारांच्या सहाय्याने या धावा त्याने केल्या.
विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक खास स्टोरी शेअर केली. विराटच्या शतकानंतर अनुष्काने ही स्टोरी शेअर केली असून त्याच्या आजारपणाची माहितीही दिली. अनुष्काणे स्टोरीला लिहिले होती की, “आजारपणातही तू धैर्याने फलंदाजी केली, हे पाहून मी नेहमी प्रेरित होते.” दरम्यान, विराटच्या आजारणाविषयी अनुष्काने सांगण्याआधी कुठलीच कल्पना चाहत्यांना नव्हती. पण या स्टोरीनंतर आजारी असूनही विराटने संघासाठी एवढी चांगली खेळी केल्याचे चाहत्यांना समजले. अनुष्काच्या या स्टोरीनंतर चाहत्यांच्या मनातील विराटची प्रतिमा अधिकच उंचावली आहे.
दरम्यान, विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 28वे शतक होते, जे द्विशतकात बदलता – बदलता राहिले. विराटने आवल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 7 द्विशतके केली आहेत. विराटने या सामन्यातील 186 धावांनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या इतिहासात आपल्या 1800 धावा पूर्ण केल्या आणि भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सामन्याचा एकंदरीत विचार केला तर भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या असून सध्या भारतीय संघ 88 धावांनी आघाडीवर आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्यांदा फलंदाजीला आला आणि नाबाद 3 धावा केल्या.
(Virat Kohli played even when he was sick? Anushka’s story raised the image in the mind of the fans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियासह केकेआरचे वाढले टेन्शन! श्रेयसची दुखापत गंभीर? इतक्या दिवसांसाठी होऊ शकतो बाहेर
शतकानंतर विराट चुंबन घेत असलेले ते लॉकेट का आहे खास?