भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला एक मोठा हादरा बसला. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर हा पाठीच्या दुखापतीमुळे अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करू शकला नाही. चौथ्या दिवशी सकाळी त्याला स्कॅन करण्यासाठी दवाखान्यात दाखल केले गेले होते. आता सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, श्रेयस मोठ्या कालावधीसाठी मैदानावरून बाजूला होऊ शकतो.
अहमदाबाद कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्यापूर्वी श्रेयसने आपल्या पाठीमध्ये वेदना होत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्याला अहमदाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. बराच काळ त्याला हॉस्पिटलमध्ये विविध स्कॅन करावे लागले. यावरून त्याची दुखापत काहीशी गंभीर असल्याचे सांगितले गेले.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार,
‘श्रेयसच्या पाठीच्या खालच्या भागात ही दुखापत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही दुखापत काहीशी गंभीर असून त्यामुळे श्रेयसला जवळपास महिनाभर मैदानापासून दूर राहावे लागू शकते.”
या वृत्ताच्या आधारे विचार करायचा झाल्यास श्रेयस अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या डावातही फलंदाजी करण्याची शक्यता नाही. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत देखील तो सहभागी नाही होणार. त्यानंतर 31 मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करतो. त्याच्या अनुपस्थितीत केकेआरची फलंदाजी काहीशी कमजोर होऊ शकते.
श्रेयस अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीला न आल्याने भारतीय संघाला तितके नुकसान झाले नाही. मात्र, भारतीय संघाचा डाव 9 गडी बाद झाल्यानंतरच आटोपला गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सूर्यकुमार यादव त्याच्या जागी क्षेत्ररक्षण करताना दिसून आला.
(Shreyas Iyer Lower Back Injury Might Be Serious He Could Miss IPL Fist Phase)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: शमीला पाहून चाहत्यांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा! पाहा पुढे काय घडले
पहिल्या 50 शतकांपेक्षा शेवटच्या 25 शतकांसाठी निघाला विराटचा घाम, आकडेवारीतून दिसतात परिश्रम