---Advertisement---

“मी प्रार्थना करतो की RCB आयपीएल ट्राॅफी जिंकू नये” ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान!

On: मंगळवार, मार्च 11, 2025 5:59 PM
Royal Challengers Bengaluru
---Advertisement---

यंदाच्या 18व्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. तत्पूर्वी आरसीबी चाहते अनेकदा त्यांच्या आवडत्या संघाच्या विजयासाठी देवाला प्रार्थना करतात. पण आता एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. एक माजी भारतीय आणि चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेटपटू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) आरसीबीच्या पराभवासाठी प्रार्थना करत आहे.

रायुडू म्हणाला की, आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकू नये अशी मी प्रार्थना करेन. समालोचन करताना रायुडूने असे विचित्र विधान केले. टीव्हीवर कॉमेंट्री करताना, माजी प्रशिक्षक संजय बांगर आरसीबीचे कौतुक करत होते. बांगर म्हणत होते की आरसीबीने गेल्या काही हंगामात शानदार कामगिरी केली आहे. गेल्या हंगामात, आरसीबीने जोरदार पुनरागमन केले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यावेळी कदाचित ते ट्रॉफी जिंकतील.

हे ऐकून अंबाती रायुडू हसायला लागला आणि म्हणाला हो नक्कीच. यावेळी ते क्वालिफायर-2 मध्ये पोहोचतील. तेव्हा बांगर म्हणाले की हे म्हणणे चुकीचे आहे. आरसीबीचे चाहते तुम्हाला पाहत आहेत, म्हणून रायुडू म्हणतो की त्यांना पाहू द्या.

याआधी एका मुलाखतीत रायुडू म्हणाला होता की, अशी वेळ नक्कीच येईल जेव्हा आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकेल, पण मी प्रार्थना करतो की ते वर्ष येऊ नये. रायुडूचे यामागील कारण असे होते की त्याला चेन्नई सुपर किंग्जने दरवर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकावी असे वाटते.

महत्त्वाच्या बातम्या-

चॅम्पियन झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या कोचने केला मोठा खुलासा, म्हणाले – 12 वर्षांच्या वयात…
ICC रँकिंगमध्ये भारतीय वर्चस्व! विराट-अय्यरला दमदार खेळाच बक्षीस
बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळले जाणार ‘हे’ 3 खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---