जर एखाद्या संघाला ३ दिवसानंतर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरायचे असेल आणि इतक्यात सर्व खेळाडूंची किट बॅग चोरीला गेली, तर त्या खेळाडूंची काय अवस्था होत असेल याचा अंदाज लावणे देखील कठीण आहे. ऑस्ट्रेलियाचा देशांतर्गत क्रिकेट संघ क्वीन्सलँडच्या बाबतीतही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर सर्वत्रच एकच खळबळ उडाली आहे.
क्वीन्सलँड संघाला या आठवड्यात गुरुवारी (७ ऑक्टोबर) शेफिल्ड शिल्डच्या सामन्यात तस्मनिया संघाचा सामना करायचा होता. हा सामना ऍडीलेड ओव्हलमध्ये रंगणार होता. परंतु, सामना सुरू होण्यापूर्वी संघाच्या गाडीची काच फोडून काही खेळाडूंची क्रिकेट किट चोरीला गेली आहे. या घटनेनंतर क्वीन्सलँड संघाने याची तक्रार दक्षिण ऑस्ट्रेलिया पोलिसांना केली असून पोलिसांनी चोरांना पकडण्याची तयारी सुरू केली आहे.
क्वीन्सलँड संघाचा यष्टिरक्षक फलंदाज जिमी पियरसन याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक वॅन उभी आहे. ज्याची काच फोडून चोरांनी क्रिकेट किट लंपास केली आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी त्या दुर्देवी लोकांपैकी एक आहे ज्याने आपल्या दोन नवीन बॅट गमावल्या आहेत. जर ऍडीलेडमध्ये कोणी दोन २ नवीन बॅट घेऊन फिरताना दिसून आलं, तर कृपया करून मला माहिती द्या.” ही वॅन हॉटेलच्या बाहेर उभी होती, त्यावेळी चोरांनी संधी मिळताच,गाडीची काच फोडली आणि क्रिकेट किट चोरी केली.
क्वीन्सलँड विरुद्ध तस्मानिया यांच्यात रंगणार सामना
क्वीन्सलँड संघाने केलेल्या तक्रारीनंतर दक्षिण ऑस्ट्रेलिया पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. शेफिल्ड शील्ड गतविजेता क्वीन्सलँड संघ या हंगामाची सुरुवात गुरुवारी (७ ऑक्टोबर) तस्मानिया विरुद्ध होणाऱ्या सामन्याने करणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्ये २८ सप्टेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये पार पडणार होता. परंतु, कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता हा सामना ऍडीलेडमध्ये पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तोडफोड फलंदाजी! नितीश राणाच्या त्या शॉटने तोडली कॅमेराची लेन्स, पाहा व्हिडिओ
बाबो! काही तासांत विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटे