आयपीएल २०२१ स्पर्धेच्या ४९ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव्या हाताचा फलंदाज नितीश राणा याने ३ खणखणीत चौकार मारले होते .त्याच्या या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयात नितीश राणाने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मोलाचे योगदान दिले. यासह ब्रॉडकास्टर्सचे देखील मोठे नुकसान केले आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी देखील आपल्या मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने दिलेल्या ११६ धावांचा पाठलाग करताना नितीश राणाने २५ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार मारले होते. तर झाले असे की, या डावातील १८ वे षटक टाकण्यासाठी जेसन होल्डर गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथा चेंडू त्याने शॉर्ट चेंडू टाकला होता. ज्यावर नितीश राणाने लेग साईडच्या दिशेने चौकार मारला. तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर असलेल्या कॅमेऱ्याला जाऊन धडकला. ज्यामुळे कॅमेऱ्याची लेन्स पूर्णपणे तुटली. त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असलेला राशिद खान कॅमेऱ्याची लेंसची पाहणी करताना दिसून आला होता.
या अप्रतिम शॉट नंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.एका युजरने लिहीले की, “स्टार स्पोर्ट्स वाल्यांचे मोठे नुकसान, आता राणा साहेब भरपाई करणार.” तर दुसऱ्या एका युजरने ट्विट करत लिहिले की, “नितीश राणाने कॅमेरचा जीव घेतला आहे.” तसेच आणखी एका युजरने लिहिले की, “कृपया करून आता नवीन लेन्स मागवा.”
Nitish Rana's boundary broke the camera's glass. pic.twitter.com/3QWEeJHCgL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 3, 2021
Nitish Rana killed a camera pic.twitter.com/GpQJCjJpwI
— Matt is on here once a day only for sport news (@MSwift94) October 3, 2021
Nitish Rana broken camera lense.#KKRvSRH #IPL2021 pic.twitter.com/fil86FsHIX
— Mohali to Melbourne 82* (@MelbourneNT82) October 3, 2021
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना ११५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शुबमन गिलने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर नितीश राणाने २५ आणि दिनेश कार्तिकने १८ धावांचे योगदान दिले. यासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबो! काही तासांत विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटे
हैदराबादविरुद्ध अवघ्या १८ धावा करताच दिनेश कार्तिकच्या नावे झाली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
Video: मिताली राजला धोनीकडून शिकायचंय हे कौशल्य, दिवस-रात्र कसोटीनंतर व्यक्त केली इच्छा






