---Advertisement---

भारताबाहेरही उन्मुक्त चंदचा जलवा! सिलिकॉन व्हॅली स्ट्राइकर्सला मिळवून दिले मायनर लीग स्पर्धेचे जेतेपद

On: सोमवार, ऑक्टोबर 4, 2021 11:47 PM
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी उन्मुक्त चंद याने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवले होते. परंतु, भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला. आता तो सध्या अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे. त्याने नुकतेच अप्रतिम कामगिरी करत मायनर लीग क्रिकेट २०२१ स्पर्धेत आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मायनर लीग क्रिकेट २०२१ स्पर्धेत सिलिकॉन व्हॅली स्ट्राइकर्स विरुद्ध न्यू जर्सी स्टेलियंस या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पार पडला. या सामन्यात सिलिकॉन व्हॅली स्ट्राइकर्स संघाने जोरदार विजय मिळवत मायनर लीग क्रिकेट २०२१ स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे.

https://twitter.com/UnmuktChand9/status/1444959344206954496

या सामन्यात न्यू जर्सी स्टेलियंस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण संघाला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर, या संघातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सुरुवातीला हा १७० पेक्षा ही अधिक धावा करणार असे वाटत होते.

परंतु, सिलिकॉन व्हॅली स्ट्राइकर्स संघातील गोलंदाजांनी २० षटकांअखेर न्यू जर्सी स्टेलियंस संघाला अवघ्या १४१ धावांवर रोखले. या दरम्यान डॉमिनिक रिखीने ४२ आणि सेटेजा मुक्कमालाने ३१ धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करताना सिलिकॉन व्हॅली स्ट्राइकर्स संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. राहुल जरीवाला आणि उन्मुक्त चंद यांनी मिळून ३.५ षटकात २८ धावा केल्या होत्या. त्यानंतर राहुल २२ धावा करत माघारी परतला होता. तसेच उन्मुक्त चंद देखील २१ धावा करत माघारी परतला होता. नंतर नरसिंग देवनारायणने या डावात नाबाद ५२ धावांची खेळी केली होती. तर रोशनने नाबाद ३१ धावांची खेळी करत सिलिकॉन व्हॅली स्ट्राइकर्स  संघाला हा सामना जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या – 

काय सांगता? सामना तीन दिवसांवर असताना ‘या’ संघातील खेळाडूंचे क्रिकेट किट गेले चोरीला

सातत्याने फ्लॉप ठरत असलेल्या हार्दिक पंड्याची टीम इंडियात टी२० विश्वचषकासाठी ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो जागा

तोडफोड फलंदाजी! नितीश राणाच्या त्या शॉटने तोडली कॅमेराची लेन्स, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---